Pimpri Crime: पिंपरीत थरारक घटना; प्रियकरासोबत आईकडून सहा वर्षीय मुलाची हत्या

प्रेमसंबंधात अडथळा ठरल्याने कट रचून खून; फरार प्रियकराला आंध्र प्रदेशातून अटक, पोलिस कोठडी सुनावली
Murder
MurderPudhari
Published on
Updated on

पिंपरी: प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या सहा वर्षीय मुलाला आईने तिच्या प्रियकरासोबत कट रचून ठार केले. या गुन्ह्यात आरोपी असलेला फरार प्रियकर राम विनायक कजेवाडी (रा. कुरुळी, ता. खेड, मूळ रा. पूस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याला दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आंध प्रदेश आणि अंबाजोगाई येथे पाठलाग करून शुक्रवार (दि. 17) अटक केली आहे.

Murder
Maval MIDC Land Acquisition Protest: मावळ MIDC प्रकल्पासाठी बऊर-करुंजमध्ये जमीन व्यवहारांना ब्रेक; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आई आणि तिच्या प्रियकराने संगनमत करून शनिवारी (दि. 4) रात्री साडेअकराच्या सुमारास चाकण औद्योगिक वसाहतीतील कुरुळी (ता. खेड) येथे सहा वर्षांच्या बालकाची निर्घृण हत्या केली होती. मुलाचा खून केल्यानंतर त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचा बनाव करण्यात आला होता.

Murder
Farmer ID Mandatory Fertilizer Agristack: ॲग्रीस्टॅक योजनेत फार्मर आयडी सक्तीचा; खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना अडचणी

आवेज मेहबूब शेख (वय 6) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणात इसाक शेख (49, मूळ रा. अंबाजोगाई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी बसरिन मेहबूब शेख (27, रा. मु. पो. पूस, ता. अंबाजोगाई, बीड) हिला अटक केली असून, तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड (रा. कुरुळी, ता. खेड, मूळ रा. पुस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो फरार होता.

Murder
Pimpri Akshaya Tritiya Mango Price Rise: अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी बाजारात फुलली गर्दी; हापूसचे दर गगनाला

बसरिन शेख आणि राम कजेवाड यांचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधात सहा वर्षीय आवेज हा अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघांनी शनिवारी रात्री त्याला बाथरूममध्ये नेले. त्याचे डोके बादलीतील पाण्यात बुडवून ठार केले. त्यानंतर मृतदेह धर्मापुरी (ता. परळी, जि. बीड) येथे नेऊन त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव केला; मात्र, यामध्ये नातेवाईकांना संशय आला.

Murder
Pimpri Chinchwad Property Tax Discount: पिंपरी-चिंचवडमध्ये 30 जूनपर्यंत मालमत्ताकर सवलत; 16 प्रकारच्या सवलतींची घोषणा

नातेवाईकांनी बीड जिल्ह्यातील परळी ग््राामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सांगितले. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. आवेज याचा मृत्यू हृदयाच्या धक्क्याने झाला नसून पाण्यात बुडवून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी आवेजच्या आईला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारपूस केली असता तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. पुढे परळी ग््राामीण पोलिसांनी हा गुन्हा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिला. दक्षिण महाळुंगे पोलिसांनी बुधवार गुन्ह्याची नोंद केली. त्यानुसार, फरार आरोपीचा तपास घेत असताना तिरुपती आंध प्रदेश आणि बीड या ठिकाणी त्याचा पाठलाग करून आरोपीस अटक केली. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news