Chicken Waste Collection Issue: पिंपरीत चिकन वेस्ट उघड्या वाहनांतून वाहतूक; दुर्गंधी व आरोग्याचा गंभीर धोका

नागरिकांचा संताप वाढला; बंदिस्त यंत्रणा नसल्याने परिसरात दुर्गंधी, संसर्गाचा धोका आणि प्रशासनावर कारवाईची मागणी
Chicken Waste Collection Issue
Chicken Waste Collection IssuePudhari
Published on
Updated on

पिपरी: शहरात स्वच्छतेच्या नावाखाली सुरू असलेली चिकन वेस्ट संकलन व्यवस्था प्रत्यक्षात नागरिकांसाठी डोकेदुखी आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न बनली आहे. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारीनंतर केलेल्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आले. पालिकेच्या चिकन वेस्ट उचलणाऱ्या वाहनांमधून कोणतेही बंद झाकण किंवा संरक्षक आच्छादन न लावता चिकनचे कचरा वाहून नेला जात असल्याचे आढळले. परिणामी चिकन वेस्ट संकलन करणारी गाडी आल्यास परिसरात असह्य दुर्गंधी पसरत असून नागरिकांना नाक दाबून चालण्याची वेळ येत आहे.

Chicken Waste Collection Issue
World Best Schools Prize 2026: कासारवाडीच्या महापालिका शाळेला जागतिक सन्मान; ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल्स प्राईज 2026’मध्ये नवोपक्रम पुरस्कार

सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना अक्षरशः श्वास रोखून चालावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. याहूनही गंभीर बाब म्हणजे उघड्या चिकन वेस्टवर कावळे घिरट्या घालत होते. अनेक कावळे थेट वाहनावर बसून मांस टिपत असल्याचे दिसून आले. या झुंडी अचानक खाली झेपावत असल्याने दुचाकीस्वारांचा तोल जाण्याचा धोका निर्माण होत असून लहान मुलांवरही कावळे झडप घालण्याच्या घटना नागरिकांनी सांगितल्या. अशा प्रकारे केवळ दुर्गंधीच नव्हे, तर अपघात आणि संसर्गाचाही धोका वाढत आहे.

Chicken Waste Collection Issue
Illegal Hoardings Removal: पालखी मार्गावरील ७० अनधिकृत होर्डिंग्ज हटवले; पीएमआरडीएची कारवाई सुरू

वाहनातून चिकन वेस्टमधील सडके, दुर्गंधीयुक्त द्रव रस्त्यावर गळत असल्याचे स्पष्ट दिसून आले. अनेक ठिकाणी हा कचरा रस्त्यावर सांडत असल्याने संपूर्ण मार्ग दूषित होत आहे. या घाणीवर माशा, भटकी कुत्री, कावळे आणि इतर पक्ष्यांची गर्दी होत असून संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. नागरिकांचा आरोप आहे की, पालिकेची वाहने वेळेवर येत नाहीत. अनेकदा तासन्तास चिकन वेस्ट दुकानदारांकडे साचून राहतो आणि नंतर तो उघड्यावरून वाहून नेला जातो. स्वच्छता राखण्याऐवजी ही व्यवस्था शहरभर दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा प्रसार करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

Chicken Waste Collection Issue
Urban Street Design Project: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’ला सर्वोच्च न्यायालयाचे बळ; पादचारी मार्गांना नवा आधार

स्वच्छ शहर, स्मार्ट शहर आणि आरोग्यदायी शहराच्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाने या वाहनांसाठी बंदिस्त कंटेनर, झाकणयुक्त यंत्रणा आणि सुरक्षित वाहतुकीचे नियम का लागू केले नाहीत, असा सवाल आता उपस्थित होत आहे. सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारे मांस, मटण कचऱ्याची उघड वाहतूक करणे हे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे, त्याच यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे शहरात दुर्गंधी, घाण आणि संसर्गाचे सावट निर्माण होत असेल, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार, हा प्रश्न आता नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.

Chicken Waste Collection Issue
Gunjvani Dam Protest: वराळे गावात गायरान जमिनीच्या ताब्यावरून तणाव; पोलिस बंदोबस्तात ताब्याची प्रक्रिया

आम्ही कचरा संकलन करण्याची वेळ ही कार्यालयीन व शालेय वेळेत न करता इतर वेळी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. चिकन वेस्टची वाहतूक पूर्णपणे बंदिस्त वाहनातून आणि नियमानुसार होणे अपेक्षित आहे. जर कोणतेही वाहन उघड्यावरून वेस्ट वाहतूक करत असल्याचे आढळले, तर संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे कचरा संकलन विभागाचे अंकुश वाळके यांनी सांगितले.

रोज रस्त्यावरून जाताना नाक दाबून चालावे लागते. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना याचा सर्वाधिक त्रास होतो. उघड्यावरून चिकन वेस्टची वाहतूक थांबवून बंदिस्त वाहने वापरणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे

मंगेश सुरवसे, स्थानिक रहिवासी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news