Pimpri Shatrughna Kate Controversy: नसरापूर प्रकरणावर मौन; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यावर टीका

जल्लोषाच्या कार्यक्रमावरून वाद; असंवेदनशीलतेबद्दल शहरभर नाराजी
Shatrughna Kate
Shatrughna KatePudhari
Published on
Updated on

पिंपरी: भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना नसरापूर येथील साडेतीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या झाल्याच्या घटनेचा विसर पडल्याचे समोर आले आहे. सत्तेतील पक्षाच्या शहराध्यक्षांनी त्या अमानुष्य घटनेचा साधा निषेध केला नाही.

Shatrughna Kate
Pimpri PMRDA Budget 2026: पीएमआरडीएचा ४,६२८ कोटींचा अर्थसंकल्प; मेट्रो-रस्ते विकासाला गती

मात्र, इतर राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयांसाठी जल्लोष करण्यास फुरसत मिळाली. विजयोत्सव करण्यासाठी या, असे निरोप संपूर्ण शहरात धाडण्यात आले. त्या आनंदोत्सवाच्या कार्यक्रमावरुन घूमजाव करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली. शहराध्यक्ष काटे यांच्या अशा या असंवेदनशीलतेमुळे शहरभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Shatrughna Kate
Pune Metro Line 3: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोला गती; 31 मेपर्यंत सेवा सुरू होण्याची शक्यता

भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर ज्येष्ठ नागरिकांने लैंगिक अत्याचार करून खून केला. त्या घटनेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी साधा निषेध केला नाही. मात्र, पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी या तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने अभूतपूर्व विजय मिळाल्याबद्दल पक्षाच्या मोरवाडी येथील कार्यालयात सोमवारी (दि.4) दुपारी चारला त्यांनी विजयोत्सव आयोजित केला होता. तसा निरोप शहराध्यक्ष काटे यांनी सर्व पदाधिकार्यांसह, सदस्य तसेच, नगरसेवकांना धाडला होता. चूक झाल्ूयाचे लक्षात आल्यानंतर या निरोपात बदल करण्यात आला. अगदी साधेपणाने विजयोत्सव साजरा करण्यात येणार आहे. नसरापूर येथील दुर्दैवी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही प्रकारचा आनंदोत्सव व जल्लोष केला जाणार नाही, असे शहराध्यक्षांनी नमूद केले.

Shatrughna Kate
Talegaon Bus Stop Issue: तळेगावात बसथांब्यावर निवाऱ्याचा अभाव; प्रवाशांचे हाल

शहराध्यक्षपद शोभेचे?

विधानसभा निवडणुकीत आमदार शंकर जगताप यांच्या उमेदवारीला नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी विरोध केला होता. पक्षात नाहक बंडाळी नको म्हणून पक्ष संघटनेत काहीच कार्य नसताना, त्यांना ऐन निवडणुकीत पक्षाचे शहर कार्याध्यक्ष पद बहाल करून शांत करण्यात आले. त्यानंतर शहराध्यक्षपदाची रितसर निवडणूक झाली. शहराध्यक्ष असतानाही काटे यांना पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते. पक्षाच्या चार आमदारांनी उमेदवार निश्चित करण्याचे निर्णय घेतले. त्यामुळे शहराध्यक्ष पद हे केवळ शोभेचे ठरले. ऐन निवडणुकीत प्रचारात निगडी येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष काटे यांचे जाहीरपणे कान टोचले होते. पिंपळे सौदागर प्रभागातील पक्षाचे सर्वच्या सर्व चार उमेदवाराचे पॅनेल निवडून आणा, असे आदेश त्यांनी त्यांना दिला होते. मात्र, संपूर्ण पॅनेल निवडून आणण्यात काटे हे अपयशी ठरले.

Shatrughna Kate
Pimpri Summer Swimming Pool: पिंपरीत उन्हाळ्याचा तडाखा; जलतरण तलावांवर मोठी गर्दी

महापौरपदाचे स्वप्न भंगले

सत्तारूढ पक्षाचे शहाध्यक्षपद असल्याने शत्रुघ्न काटे यांना महापौर पदाचे वेध लागले होते. तेही मिळाले नाही. भाजपाची कोंडी केल्याने त्यांना शहराध्यक्षपद दिले खरे मात्र कोणतेही अधिकारी नाहीत. पक्षातील सर्वांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात ते एकटे पडले. चिंचवड, भोसरी व पिंपरी विधानसभा तसेच, निष्ठावंत, आरएसएस, हिंदुत्वावादी संघटना अशा वेगवेगळ्या गटांचे समाधान करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नसल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news