Pimpri PMRDA Budget 2026: पीएमआरडीएचा ४,६२८ कोटींचा अर्थसंकल्प; मेट्रो-रस्ते विकासाला गती

पिंपरी-चिंचवड परिसरात पायाभूत सुविधांना चालना; टनेल, रिंग रोड, गृहनिर्माण प्रकल्पांना प्राधान्य
Pimpri PMRDA Budget 2026
Pimpri PMRDA Budget 2026Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: पुणे महानगर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठीचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 4,628.85 कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी अर्थसंकल्प मंजूर केला आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, वाहतूक, पर्यटन, गृहनिर्माण आणि पर्यावरणीय प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आले आहे. पीएमआरडीए क्षेत्रातील रिंग रोड, मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास, कात्रज-येरवडा ट्विन टनेल, लोणावळा स्कायवॉक, पवना-इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, अर्बन ग्रोथ क्लस्टर, सीएम पॅकेजमधील रस्ते, तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास रस्ते, गृहनिर्माण प्रकल्प या कामांना गती मिळणार आहे. तसेच क्षेत्रातील अंतर्गत 23 गावांचा संरचनात्मक आराखडाही तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिले.

Pimpri PMRDA Budget 2026
Pune Metro Line 3: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोला गती; 31 मेपर्यंत सेवा सुरू होण्याची शक्यता

जमीन विल्हेवाटीबाबतचे निर्णय आतापर्यंत प्राधिकरण सभा तसेच वार्षिक सभेमध्ये होत होते. वर्षातून ही सभा एक किंवा दोनदा घेतली जात होती; परंतु या अर्थसंकल्पानंतर आता जमीन विल्हेवाटीबाबतचे सर्वच निर्णय स्थानिक पातळीवर पीएमआरडीए आयुक्त घेतील. यापूर्वी जमीन विल्हेवाट निर्णयाबाबत नागरिकांना सभेची वाट पाहत ताटकळत बसावे लागत होते. परंतु आता हा विलंब टळणार असून वेळेत निर्णय मिळू शकेल.

लोणावळा स्कायवॉक

लोणावळ्यातील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकास आणि स्कायवॉक उभारणीसाठी सन 2026-27 करता 5,000 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Pimpri PMRDA Budget 2026
Talegaon Bus Stop Issue: तळेगावात बसथांब्यावर निवाऱ्याचा अभाव; प्रवाशांचे हाल

कात्रज-येरवडा ट्विन टनेल

प्राधिकरण क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या टनेल प्रकल्पासाठी सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात 500.00 लक्ष रुपयांची तरतूद आहे.

पुरंदर विमानतळ, इनर रिंग रोड

या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली असून हे प्रकल्प भविष्यात पुण्याच्या विकासासाठी निर्णायक ठरणार आहेत.

क्रीडा

अर्थसंकल्पात क्रीडा पायाभूत सुविधा उभारणीसाठी 3,000 लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास रस्ते

धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी 3,000 लाख आणि पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी 3,000 लाख अशा एकूण 6,000 लाख रुपयांच्या कामांचे नियोजन अर्थसंकल्पातून करण्यात येणार आहे.

Pimpri PMRDA Budget 2026
Pimpri Summer Swimming Pool: पिंपरीत उन्हाळ्याचा तडाखा; जलतरण तलावांवर मोठी गर्दी

रिंग रोड

प्रादेशिक योजनेतील रिंग रोडसाठी प्रकल्प अहवाल, प्रत्यक्ष काम आणि भूसंपादनासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष उद्देश वाहन मधील भांडवली सहभागासाठी तरतूद करण्यात आली आहे. सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी एकूण 5,500 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली आहे.

मेट्रो प्रकल्प

शिवाजीनगर ते हिंजवडी या महत्वाकांक्षी मेट्रो लाईन-3 प्रकल्पासाठी एकूण 14,080.00 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारचा व्हीजीएफ वाटा, युटिलिटी शिफ्टिंग आणि सल्लागार शुल्काचा यात समावेश आहे.

रस्ते विकास

औद्योगिक क्षेत्रांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी 2,500.00 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागरी विकास केंद्रांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी 10,000 लाख रुपये प्रस्तावित आहेत. प्राधिकरण क्षेत्रातील आरपी, डीपी, सीएमपी, सीपीटीएस रस्त्यांच्या कामांसाठी 15,000.लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पूल, सब-वे, रस्ते आणि रेल्वे उड्डाणपुलांच्या कामांसाठी 15,000.लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सीएम पॅकेजमधील रस्ते विकास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंजूर रस्त्यांच्या कामांसाठी सन 2025-26 च्या सुधारित अंदाजात 90,000.लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली होती.

पवना-इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प

इंद्रायणी नदी सुधारणेसाठी 10,000.लाख आणि पवना नदी सुधारणेसाठी 4,000लाख लक्ष रुपयांची तरतूद आहे. मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी 220.लाख रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे.

Pimpri PMRDA Budget 2026
Pimpri Fruit Market: पिंपरीत रानमेवा भाव खातोय; जांभूळ-करवंद आंब्यापेक्षा महाग

ड्रेनेज व सांडपाणी

नागरी विकास केंद्रांतर्गत मलनि:सारण प्रकल्पांसाठी सन 2026-27 मध्ये 20,000.लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

सार्वजनिक सोयीसुविधा

सार्वजनिक सोयीसुविधांच्या विकासासाठी 500.00 लाख रुपयांची तरतूद केली आहे.

गृहनिर्माण प्रकल्प

पेठ क्र. 12 मधील गृहनिर्माण योजना आणि वाल्हेकरवाडी येथील प्रकल्पांसह गृहयोजना व इतर बांधकामे या संपूर्ण विभागासाठी सन 2026-27 साठी एकूण 36,589.70 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

कात्रज-येरवडा ट्विन टनेलच्या कामासाठी स्वतंत्र विशेष उद्देश वहन संस्था निर्माण करावी. त्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा; तसेच पीएमआरडीए व पुणे महापालिकेने संयुक्तपणे कार्यवाही करावी. पीएमआरडीएने आपल्या हद्दीतील गावांसाठी संरचनात्मक आराखडा सहा महिन्यांत तयार करावा. पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या गावांचा विकास आराखडा तयार करण्यात यावा.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री तथा अध्यक्ष, पीएमआरडीए

पीएमआरडीएचा 2026-27 चा अर्थसंकल्प हा केवळ आर्थिक दस्तऐवज नसून पुणे महानगर प्रदेशाच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप आहे. मेट्रो, रस्ते, टनेल, नदी सुधारणा, गृहनिर्माण आणि पर्यटन यांसारख्या विविध क्षेत्रांना एकत्रितपणे चालना देणारा हा अर्थसंकल्प शहराच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश अधिक सक्षम, आधुनिक आणि शाश्वत बनण्याच्या दिशेने वाटचाल करू शकेल.

डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त पीएमआरडीए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news