Bavdhan Bike Theft: दुचाकी चोरून पार्ट वेगळे करून भंगारात विक्री; बावधन पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

दोन सराईत आरोपींसह अल्पवयीन ताब्यात; पाच दुचाकींसह २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Theft
Theft AI Generated Image
Published on: 
Updated on: 

पिंपरी: दुचाकी चोरल्यानंतर त्यांचे स्पेअर पार्ट वेगळे करून भंगारात विकणाऱ्या टोळीचा बावधन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन सराईत आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून पाच दुचाकी आणि विविध वाहनांचे स्पेअर पार्ट असा दोन लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Theft
Pimpri Police Quarters: पोलिसांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेलाच धोका; त्रिवेणीनगर पोलिस क्वार्टर्समध्ये उघडी मॅनहोल्स, कचऱ्याचे ढीग

पवन मरिअप्पा भज्जी (वय २५, रा. औंध) आणि ऋषिकेश शहाजी साठे (वय २९, रा. पिंपळे निलख) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Theft
Voter Registration: १८ वर्षे पूर्ण झालीत? मतदार यादीत नाव नसेल तर लगेच करा नोंदणी; पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोहीम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील रोहन लेहर सोसायटी परिसरातून यामाहा एमटी-१५ (एमएच १३ ईडब्ल्यू ५८४७) ही दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सुमारे ९० ते १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यामध्ये संशयित चोरीची दुचाकी घेऊन पिंपळे निलख येथील इंगवले चौकाच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले.

Theft
Waste Management PCMC: शंभर किलो कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांचे सर्व्हेक्षण

त्यानुसार, पोलिसांनी इंगवले चौकातील हॉटेल जगदंबाच्या मागील परिसरात शोध घेतला. तेथे आरोपी ऋषिकेश साठे याचे फॅब्रिकेशनचे दुकान असल्याचे समोर आले. चोरीच्या दुचाकी या दुकानात आणून त्यांचे स्पेअर पार्ट वेगळे केले जात होते. त्यानंतर हे पार्ट भंगारात विकले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दुकानातून चोरीच्या दुचाकी आणि विविध वाहनांचे स्पेअर पार्ट जप्त केले.

Theft
Pimpri Chinchwad Degue Malaria Cases: सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे ७० तर मलेरियाचेही ८ रुग्ण पॉझिटिव्ह

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सारंग ठाकरे, पोलिस अंमलदार स्वप्निल साबळे आणि अक्षय लाटे यांच्या पथकाने केली. या घटनेचा पुढील तपास बावधन पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news