Pimpri Police Quarters: पोलिसांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेलाच धोका; त्रिवेणीनगर पोलिस क्वार्टर्समध्ये उघडी मॅनहोल्स, कचऱ्याचे ढीग

तुटलेली ड्रेनेज चेंबर्स आणि अस्वच्छ परिसरामुळे रहिवाशांमध्ये चिंता; देखभाल नेमकी कोणाची, असा सवाल
Pimpri Police Quarters
Pimpri Police QuartersPudhari
Published on: 
Updated on: 

बजरंग मासाळ

पिंपरी: शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यांच्या सरकारी निवासस्थानातच निर्माण झाला आहे. त्रिवेणीनगर वाकड येथील पोलिस क्वार्टर्समध्ये इमारतींच्या पायथ्याशी साचलेले कचऱ्याचे ढीग, तुटलेली ड्रेनेज चेंबर्स, उघडी मॅनहोल्स आणि अस्वच्छ परिसरामुळे रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Pimpri Police Quarters
Voter Registration: १८ वर्षे पूर्ण झालीत? मतदार यादीत नाव नसेल तर लगेच करा नोंदणी; पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोहीम

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उभारलेल्या या निवासस्थानांची नियमित देखभाल कोण करणार, हा प्रश्नही यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, परिसरातील काही धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती वेळेवर न झाल्याने नागरिकांना त्यातून मार्ग काढावा लागत आहे. लहान मुले परिसरात खेळत असल्याने उघडी मॅनहोल्स आणि तुटलेली चेंबर्स अधिक धोकादायक ठरत आहेत.

Pimpri Police Quarters
Waste Management PCMC: शंभर किलो कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांचे सर्व्हेक्षण

उघडी मॅनहोल्समुळे अपघाताचा धोका

क्वार्टर्स परिसरातील काही ठिकाणी मॅनहोल्स उघडी असल्याचे दिसून येते. त्यावर सुरक्षित झाकणे नसल्याने रात्रीच्या वेळी विशेष धोका निर्माण होतो. पावसाळ्यात किंवा अंधारात ही ठिकाणे अधिक धोकादायक ठरत आहेत. तुटलेल्या चेंबरभोवतीही कायमस्वरूपी सुरक्षितता उपाययोजना नसल्याने पादचारी आणि लहान मुलांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?, असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Pimpri Police Quarters
Pimpri Chinchwad Degue Malaria Cases: सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे ७० तर मलेरियाचेही ८ रुग्ण पॉझिटिव्ह

इमारतींच्या पायथ्याशीच पडला कचरा

क्वार्टर्समधील इमारतींच्या पायथ्याशी कचरा साचल्याचे चित्र आहे. नियमित स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नसल्याचे या परिस्थितीतून दिसून येते. कचरा साचल्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारी निवासस्थान परिसरातच अशी अवस्था असल्याने संबंधित यंत्रणांच्या नियमित पाहणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Pimpri Police Quarters
Moshi Waste To Energy Project: 'वेस्ट टू एनर्जी' चार महिन्यांपासून बंद; एक हजार टन कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

देखभाल नेमकी कोणाची?

सरकारी पोलिस क्वार्टर्सची सिव्हिल दुरुस्ती, इमारतींची देखभाल, ड्रेनेज व्यवस्था आणि परिसरातील मूलभूत पायाभूत सुविधांची देखभाल याबाबत संबंधित यंत्रणांमध्ये स्पष्ट समन्वय असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्ष परिसरातील परिस्थिती पाहता सेंट्रल बिल्डिंग विभागकडून नियमित देखभाल आणि पाहणी होते का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. धोकादायक चेंबर्स, उघडी मॅनहोल्स किंवा इतर बांधकामविषयक त्रुटी लक्षात येण्यासाठी नियमित पाहणी आवश्यक असताना ती प्रभावीपणे होत आहे का, याचे उत्तर संबंधित विभागाने देणे गरजेचे आहे.

क्वार्टर्समध्ये आमची कुटुंबे राहतात. मुले खाली खेळत असतात. त्यामुळे उघडी मॅनहोल्स आणि तुटलेली चेंबर्स पाहिल्यावर भीती वाटते. एखादी दुर्घटना होण्यापूर्वी ही कामे झाली पाहिजेत.

रहिवाशी, पोलिस क्वार्टर्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news