Pimple Nilakh Traffic Safety Issue: गोविंद गार्डन-यशदा चौक धोकादायक; नागरिकांमध्ये संताप

तुटलेले बॅरिकेड्स, अतिक्रमण आणि निकृष्ट रस्त्यांमुळे वाढला अपघाताचा धोका; प्रशासनाकडून उपाययोजनांची गरज
Pimple Nilakh Traffic Safety Issue
Pimple Nilakh Traffic Safety IssuePudhari
Published on
Updated on

पिंपळे निलख: पिंपळे सौदागरमधील गोविंद गार्डन-यशदा चौक सध्या समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचे चौक आज सुरक्षिततेच्यादृष्टीने धोकादायक ठरू लागला आहे.

Pimple Nilakh Traffic Safety Issue
Indrayani River Drowning: कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

ठिकठिकाणी तुटले बॅरिकेड्स

बीआरटी बसस्टॉपवर पोहोचण्यासाठी नागरिकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. बसस्टॉपकडे जाण्यासाठी असलेले बॅरिकेड्स ठिकठिकाणी तुटले असून, त्या तुटलेल्या जाळ्यांमधून नागरिक थेट बीआरटी मार्गावर जाताना दिसत आहेत. काहीजण तर भरधाव वाहतुकीतून धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडताना दिसत आहे.

Pimple Nilakh Traffic Safety Issue
Pimpri Chinchwad Heatwave: पिंपरी-चिंचवडमध्ये तापमान 40 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

अपघाताचा धोका

वाहतूक शिस्तीचा तर येथे पूर्णपणे बोजवारा उडालेला दिसत आहे. काही चालक सर्रासपणे विरुद्ध दिशेने वाहने चालवत आहेत. त्यातच काही कंपन्यांची वाहने चौकातच थांबवून कर्मचाऱ्यांना उतरवण्याचे प्रकार सुरू असल्याने वाहतूककोंडी अधिकच वाढत आहे. दरम्यान, नुकतेच पीएमपीकडून बीआरटी मार्गावरील एकूण 10 बसस्थानकांच्या नामफलकांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. जगताप डेअरी चौक ते पी. के. चौक या मार्गावरील जगताप डेअरी चौक, शिवार गार्डन चौक, रोजलँड सोसायटी, कोकणे चौक, काटे पाटील चौक, पी. के. चौक, गोविंद यशदा चौक, नर्मदा गार्डन, विश्वशांती कॉलनी आणि कस्पटे चौक या स्थानकांवर नवीन नामफलक बसविण्यात आले आहेत. मात्र, जुने नामफलक काढून टाकण्याचे काम अर्धवटच राहिल्याने ते बसस्थानकांच्या परिसरात पडून आहेत. गंजलेले फलक, दुर्गंधी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

Pimple Nilakh Traffic Safety Issue
Pimpri Chinchwad STP: पिंपरी-चिंचवडमध्ये 99 सोसायट्यांचे एसटीपी बंद; महापालिकेचा कडक इशारा

नागरिकांमध्ये नाराजी

यात भर म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच बीआरटी रोडवर करण्यात आलेले डांबरीकरणही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नुकतेच केलेले डांबर काही ठिकाणी निघून गेले असून, रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पदपथावरच राडारोडा

याच चौकात पादचारी मार्गाची अवस्थादेखील अत्यंत बिकट आहे. पदपथ पूर्णपणे तुटलेले असून, त्याचा राडारोडा तिथेच पडून आहे. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. परिणामी, नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.

Pimple Nilakh Traffic Safety Issue
Pimpri Chinchwad RTO Illegal Activities: पिंपरी-चिंचवड आरटीओ परिसरात अवैध प्रकारांचा सुळसुळाट; नागरिक हैराण

आम्ही आजच त्या ठिकाणची पहाणी करतो व पदपथाचे काम केले जाईल. तसेच, बीआरटी स्टॉपमध्ये जुने नामफलक पडून आहेत तेदेखील उचलायचे काम सुरू आहे.

अमोल पाचगणे, दळण वळण प्रकल्प विभाग, ड क्षेत्रीय कार्यालय

दररोज या रस्त्यावरून शतपावलीसाठी जाताना भीती वाटते. कुठे पदपथ नाही, कुठे रेलिंग तुटलेले आहेत. प्रशासन फक्त पाहत बसलंय का? एखादा मोठा अपघात झाल्यावरच जाग येणार का?

विश्वनाथ यादव, स्थानिक नागरिक

गोविंद गार्डन-यशदा चौक धोकादायक; नागरिकांमध्ये संतापआम्ही वारंवार त्याठिकाणी विरुद्ध दिशेने येणाऱ्या व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वहानांवर कारवाई करत आहोत. तसेच, वाहतूक नियमाचे उल्लंघन वारंवार केल्यास नियमानुसार दुप्पट दंड वसूल करण्यात येईल.

गोविंद पांढरे, वाहतूक पोलिस हवालदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news