Pimple Gurav Traffic Issue: सिग्नल असूनही सृष्टी चौकात गोंधळ; रस्ते चिन्हांकनाचा अभाव

झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईन नसल्याने पादचारी व वाहनचालक त्रस्त; अपघाताची भीती
Pimple Gurav Traffic Issue
Pimple Gurav Traffic IssuePudhari
Published on
Updated on

पिंपळे गुरव: पिंपळे गुरवमधील अत्यंत वर्दळीच्या सृष्टी चौकात वाहतूककोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून काही दिवसांपूर्वी वाहतूक सिग्नल सुरू करण्यात आला. मात्र, सिग्नल कार्यान्वित झाल्यानंतरही चौकात झेबा क्रॉसिंग, स्टॉपलाईन आणि लेन मार्किंग यांसारखी मूलभूत रस्ते चिन्हांकने करण्यात आलेली नसल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या नियोजनावर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

Pimple Gurav Traffic Issue
Vadgaon Maval Crematorium Protest: स्मशानभूमीसाठी वडगाव मावळात ग्रामस्थांचे आमरण उपोषण

सृष्टी चौक हा पिंपळे गुरव, कासारवाडी, सांगवी, पिंपरी तसेच इतर भागांना जोडणारा महत्त्वाचा आणि अत्यंत वर्दळीचा चौक आहे. दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी वाहने शाळकरी विद्यार्थी तसेच पादचारी या मार्गाचा वापर करतात. विशेषतः सकाळी व सायंकाळी कार्यालयीन वेळेत या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाकडून चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली. सिग्नल सुरू झाल्याने काही प्रमाणात वाहतुकीचे नियमन होऊ लागले असले तरी रस्त्यावरील आवश्यक चिन्हांकन न केल्याने चौकात गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे.

Pimple Gurav Traffic Issue
Talegaon Weekly Market Issues: तळेगाव आठवडे बाजारातील गैरव्यवस्थापन; स्थलांतराला व्यापाऱ्यांचा विरोध

स्टॉप लाईन नसल्याने शिस्तीचा फज्जा

चौकात वाहनांनी थांबण्यासाठी आवश्यक असलेली स्टॉप लाईन नसल्यामुळे अनेक वाहनचालक थेट सिग्नलच्या पुढे जाऊन वाहने उभी करतात. परिणामी वळण घेणाऱ्या तसेच मागून येणाऱ्या वाहनांना मार्ग काढताना अडथळे निर्माण होतात. वाहतुकीत गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.

Pimple Gurav Traffic Issue
Ramzan Eid Shopping: रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पिंपरी बाजारपेठेत सुकामेवा आणि शेवयांना मोठी मागणी

रस्ता पार करण्यासाठी पादचाऱ्यांची कसरत

झेबा क्रॉसिंग नसल्यामुळे पादचाऱ्यांना, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता पर करावा लागत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. रस्त्यावरील नियमांची स्पष्ट आखणी नसल्याने वाहतूक पोलिसांनाही वाहनचालकांना शिस्त लावणे कठीण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लेन मार्किंग व दिशादर्शक पट्टे नसल्याने वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहने उभी करत असल्याचे दिसून येते. वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सिग्नल असलेल्या चौकात झेबा क्रॉसिंग, स्टॉप लाईन लेन मार्किंग तसेच दिशा दर्शविणारे फलक लावावेत. मात्र सृष्टी चौकात ही मूलभूत चिन्हे नसल्याने भविष्यात अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Pimple Gurav Traffic Issue
Gas Shortage Impact Hotels: गॅस टंचाईचा हॉटेल व्यवसायावर फटका; ‌‘नो‌’ वडापाव, समोसा; ओन्ली सँडविच

नवीन कामे सुरू होणार आहेत. काही कामे टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे प्रलंबित राहिली आहेत. वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर संबंधित कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण करण्यात येतील. सध्या प्रभागातील इतर कामे पुढील दहा दिवसांत सुरू होणार असून, त्यानंतर संबंधित कामे तातडीने करण्यात येतील.

प्रसाद देशमुख, उप अभियंता, स्थापत्य विभाग, ड क्षेत्रीय कार्यालय

रोज सकाळी आणि सायंकाळी या चौकात वाहनचालकांची मोठी वर्दळ असते. झेबा क्रॉसिंग नसल्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता पार करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एखाद्या पादचार्याचा अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी.

विष्णू शेळके, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news