Ramzan Eid Shopping: रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पिंपरी बाजारपेठेत सुकामेवा आणि शेवयांना मोठी मागणी

शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी; बनारस आणि खिमामी फेणीला विशेष पसंती
Ramzan Eid Shopping
Ramzan Eid ShoppingPudhari
Published on
Updated on

पिंपरी: मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असून, येत्या शनिवारी (दि. 21) रोजी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. ईदच्या दिवशी खास असलेला ‌‘शिरखुर्मा‌’ तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुकामेवा तसेच विविध प्रकारच्या शेवया खरेदीसाठी पिंपरी बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे.

Ramzan Eid Shopping
Gas Shortage Impact Hotels: गॅस टंचाईचा हॉटेल व्यवसायावर फटका; ‌‘नो‌’ वडापाव, समोसा; ओन्ली सँडविच

रमजान पर्वात मुस्लिम बांधवांचे काही खास पदार्थ तयार होत असतात. ते पदार्थ फक्त रमजान पर्वातच उपलब्ध होतात. रमजान महिन्यात इफ्तारसाठी या पदार्थांची मेजवानी असते. त्यामुळे मिठाई, ड्रायफ्रुट तसेच खमंग पदार्थांची अनेक दुकाने शहरात थाटली असल्याचे दिसून आले आहेत.

Ramzan Eid Shopping
Maharashtra Fuel Supply Alert: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर पोलिसांचा सतर्क नजर

मुस्लीम बांधवांकडून शिरखुर्मा, सुतरफेणी, मालपोवा, शाही तुकडा, तुर्री आणि कबाब या पदार्थांना रमजान महिन्यात जास्त मागणी आहे. जवळपास या सर्वच पदार्थांमध्ये शेवया वापरल्या जातात. शहरातील बाजारात सुकामेव्याची मोठी आवक झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Ramzan Eid Shopping
Lonavala Development Plan: लोणावळा विकास आराखड्याचे पुनरावलोकन करा; राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मागणी

शहरातील विविध भागात सुकामेव्याचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉलवर मुस्लिम बाधंवाकडून सुकामेवा मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. बाजारात रमजान ईदच्या पार्श्वभुमीवर विविध प्रकारचे ड्रायफ्रुटस दाखल झाले आहेत.

Ramzan Eid Shopping
Pimpri Chinchwad Water Shortage: स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीटंचाईचा विळखा; नागरिक टँकरवर अवलंबून

बनारस, खिमामी फेणी

ईद सणात केला जाणारा सर्वात स्पशेल पदार्थ म्हणजे शिरखुर्मा. हे बनविण्यासाठी पांढऱ्या, पिवळ्या, केशरी आणि हिरव्या रंगातील बारीक शेवया घेण्यासाठी बाजारातील स्टॉलवर गर्दी होत आहे. फेणीमध्येही यंदा वेगळे प्रकार आले आहेत. यात बनारस अर्थात पातळ शेवई उपलब्ध आहे. तसेच भाजलेल्या तयार खिमामी फेणीला चांगली मागणी आहे. शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या ड्रायफ्रुटचे साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news