Pimple Gurav Illegal Parking Traffic Issue: पिंपळे गुरवमध्ये बेकायदेशीर पार्किंगमुळे वाहतूक कोंडी; कारवाईनंतरही परिस्थिती जैसे थे

मज्जिद-कल्पतरू रोडवर वाहनांची बेजबाबदार उभीकरणे; नागरिकांचा कडक नो-पार्किंगचा आग्रह
Pimple Gurav Illegal Parking Traffic Issue:
Pimple Gurav Illegal Parking Traffic Issue:Pudhari
Published on
Updated on

पिंपळे गुरव: मज्जिद-कल्पतरू रोड परिसरात वाहतूक नियमांचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, बेकायदेशीर पार्किंगमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाहतूक विभागाने अलीकडेच धडक कारवाई करत अनेक वाहनांवर ‌’जॅमर‌’ लावले; मात्र काही तासांतच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाल्याचे दिसून येत आहे.

Pimple Gurav Illegal Parking Traffic Issue:
Pimpri Chinchwad EV Demand Subsidy Impact: पिंपरी-चिंचवडमध्ये ईव्हींची मागणी वाढली; सबसिडी बंदीची शक्यता चिंतेत भर

मज्जिदसमोरील मुख्य रस्त्यावर वाहनचालक सर्रासपणे गाड्या उभ्या करत असल्याने रस्त्याची रुंदी कमी होते आणि ये-जा करणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण होतो. त्यातच काही अंतरावर असलेल्या सृष्टी चौक येथील सिग्नलमुळे सकाळी आणि संध्याकाळी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात. या कोंडीत बेकायदेशीर पार्किंग अधिकच भर घालत आहे.

Pimple Gurav Illegal Parking Traffic Issue:
RTO Online Services: आरटीओ सेवा पूर्णपणे ऑनलाईन; ‘सारथी’ आणि ‘वाहन 4.0’मधून 105 सेवा उपलब्ध

वाहतूक विभागाने यापूर्वीही अनेक वेळा दंडात्मक कारवाई केली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईत काही वाहनांना जॅमर लावून दंड ठोठावण्यात आला. मात्र, वाहनचालकांमध्ये ‌’दंड भरूनही पुन्हा त्याच ठिकाणी वाहन उभे करण्याची प्रवृत्ती दिसून येत असून कारवाईचा अपेक्षित परिणाम होताना दिसत नाही. प्रशासनाचा प्रभाव कमी झाला आहे का असा प्रश्न आता स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार की पिंपळे गुरवकरांचा प्रवास असाच कोंडीत अडकून राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Pimple Gurav Illegal Parking Traffic Issue:
PMRDA Affordable Housing: पीएमआरडीएकडून ‘सर्वांसाठी घरे’ मोहिमेला वेग; पीएमएवायअंतर्गत 3,317 घरांचे वाटप

नागरिकांची ठोस मागणी

  • मज्जिद-कल्पतरू रोड परिसरात 24 तास कडक नो पार्किंग‌’ची अंमलबजावणी

  • वाहतूक पोलिसांची नियमित व प्रभावी गस्त

  • नियमभंग करणाऱ्या वाहनांवर तात्काळ टोईंग कारवाई

Pimple Gurav Illegal Parking Traffic Issue:
Pimpri Chinchwad Cyber Fraud MCOCA: पिंपरी-चिंचवडमध्ये 11 कोटींच्या सायबर फसवणुकीत 9 जणांवर मोक्का; पोलिसांची मोठी कारवाई

मज्जिद कल्पतरू रोड परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 15 वाहनांवर जॅमरद्वारे कारवाई करण्यात आली. या कारवाईत अंदाजे 10000 ते 15000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढे संबंधित ठिकाणी रस्त्यावर वाहने उभी राहणार नाहीत याची वाहनचालकांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना वाहतूक विभागाकडून वाहनधारकांना देण्यात आलेल्या आहेत.

सुदाम पाचोरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news