PCMC Standing Committee Decisions: पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे महत्त्वाचे निर्णय; संरक्षण विभाग करारास मंजुरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपळे सौदागर येथील संरक्षण विभागाच्या जागेबाबत करारासह विविध विकासकामांना स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी
House
HousePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपळे सौदागर येथे संरक्षण विभागाच्या जागेत 18 मीटर रुंदीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्या जागेच्या बदल्यात संरक्षण विभागाला विविध ठिकाणी निवासी सदनिका महापालिका मोफत बांधून देणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्तीसह मान्यता देण्यात आली आहे. तसेच, विविध विकासकामांच्या खर्चाना स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सभा समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार (दि.13) झाली. सभेला समिती सदस्यांसह आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, नगर सचिव मुकेश कोळप व अधिकारी उपस्थित होते.

House
Maharashtra AI Drone Sugarcane Farming: ऊस शेतीत एआय ड्रोनचा वापर; उत्पादनात 35-40% वाढीचा अंदाज

महापालिकेने संरक्षण विभागाचा जागा ताब्यात घेत पिंपळे सौदागर येथील सर्व्हे क्रमांक 30, 32, 33, 34, 37, 38 आणि 39 येथे 18 मीटर रुंदीचे रस्ते विकसित केले आहे. त्यासंदर्भात महाालिकेने संरक्षण विभागासोबत करार केला आहे. त्यानुसार जागेच्या बाजारभावानुसार असलेल्या मूल्याच्या बदल्यात महापालिका संरक्षण विभागास निवासी सदनिका बांधून देणार आहे. संरक्षण विभागाच्या खडकी येथील स्टेशन मुख्यालयाने घोरपडी, खडकी व औंध येथे निवासी सदनिका बांधून देण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. त्याचा आराखडा तसेच, अंदाजपत्रक, बांधकाम परवानगी व निविदा प्रकिया आदी कामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 1.93 टक्के शुल्क दराने एनव्हायरोसेफ कन्सल्टंट हा सल्लागार थेट पद्धतीने नेमण्यात आला आहे.

House
Sunil Shelke Political Controversy: मावळमध्ये राजकीय खळबळ; रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळकेंची प्रतिक्रिया

मेट्रोला 50 कोटी रुपयांचा निधी देण्याचा विषय पुन्हा तहकूब करण्यात आला. महामेट्रोकडून निगडी ते चिंचवडचे रस्ते व्यवस्थित दुरूस्त करण्यात आलेले नाही. पुढील बैठकीत मेट्रोच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. दुरूस्ती काम तातडीने पूर्ण करण्यासाठी मेट्रो व्यवस्थापनाला पत्र देण्यात येणार आहे, असे अध्यक्ष बारणे यांनी सांगितले. काळेवाडी येथील ज्योतिबा उद्यानात 25 लाख 4 हजार रुपये खर्च करून कुस्तीचा आखाडा उभारण्यात येणार आहे. पिंपळे निलख येथील सर्व्हे क्रमांक 28 मध्ये महिला बाजार हट केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 34 लाख 41 हजार खर्च अपेक्षित आहे. प्रभाग क्रमांक 18 मधील दत्तात्रय मरळ उद्यान 11 महिन्यांच्या कालावधीसाठी मानधन तत्वावर चालविण्यास देण्यात येणार आहे.

House
Sangvi Electricity Problem: सांगवीत वीजपुरवठा संकट; जुन्या केबल्स बदलण्याची मागणी

महापालिकेच्या ई-लर्निंग प्रकल्पांतर्गत शाळा व कार्यालयांसाठी इंटरनेट बँडविड्थ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात नियमितपणे अनधिकृत बांधकाम तसेच, अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यासाठी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळासोबत (मेस्को) नव्याने करारनामा करून 16 महिन्यांसाठी थेट पद्धतीने 218 सुरक्षारक्षक विविध ठिकाणी नेमण्यात येणार आहेत. बोऱ्हाडेवाडी येथे नगर रचना योजना (टीपी स्कीम) राबविण्यात येत आहे. त्या कामासाठी अहमदाबादच्या एचसीपी डिजाईन, प्लॅनिंग ॲण्ड मॅनेजमेंट एजन्सीला प्रती हेक्टर 22 हजार 335 रुपये दराने काम करण्यास 12 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या खर्चास समितीने मान्यता दिली आहे.

House
PCMC Financial Crisis: पिंपरी-चिंचवड महापालिकेवर 4,500 कोटींचे दायित्व; आर्थिक संकट गंभीर

पुनावळेतील 91 गुंठे जागा भाड्याने देण्यास मंजुरी

महापालिकेची पुनावळे येथील सर्व्हे क्रमांक 38 पैकी व 44 पैकी एकूण 91 गुंठे म्हणजे 96 हजार 952.4 चौरस फूट जागा 30 वर्षांसाठी खासगी संस्थेला भाडे तत्त्वावर देण्यात येणार आहे. त्या आरक्षित जागेत माध्यमिक शाळेचे आरक्षण आहे. त्यासाठी दर मागविण्यात आले होते. त्या एकूण 3 निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी ईस्ट ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल फाउंडेशनची 7 कोटींचा दर स्वीकारण्यात आला आहे. महिन्यास केवळ 2 लाख भाडे असा दर आहे. त्या संदर्भात स्थायीचे अध्यक्ष अभिषेक बारणे म्हणाले की, तो विषय प्रशासनाकडून ठेवण्यात आला असून, त्या विषयाला मान्यता देऊन, समितीने सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे. मात्र, विरोधी सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला. इतक्या कमी दराने पुनावळेतील मोक्याची तब्बल 91 गुंठे जागा 30 वर्षाच्या मोठ्या कालावधीसाठी खासगी संस्थेला भाड्याने देण्याचा प्रस्तावाचा विरोध करण्यात आला.

अर्थसंकल्पाची पुस्तिका मे महिन्यात छापणार

लेखा विभागासाठी सन 2025-26 चे सुधारित व सन 2026-27 चे मूळ अर्थसंकल्प पुस्तिका छापण्यात येणार आहे. त्यासाठी पुरवठादारांकडून दर मागविण्यात आले होते. एकूण 8 लाख 74 हजार 107 रुपये खर्च त्यासाठी केला जाणार आहे. अर्थसंकल्पाची पुस्तिका न छापल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेऊन अखेर, पुस्तिका मे महिन्यात छापण्याचा निर्णय लेखा विभागाने घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news