PCMC Teacher Vacancies: पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमध्ये शिक्षकांची वानवा; ३९६ पदे रिक्त

शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले तरी मानधनावरील शिक्षकांवर शिक्षणाचा गाडा; ५७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांवर परिणाम
Teachers
Teachers Pudhari
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी: शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने झाले तरी महापालिकेच्या शाळांमध्ये कायमस्वरूपी शिक्षकांची वानवा दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षणाचा गाडा माधनावरील शिक्षकांच्या सहाय्याने ओढला जात आहे. प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील मंजूर १,५२२ पैकी शिक्षकांची ३९६ पदे रिक्त आहेत. मानधनावरील शिक्षकांची नियुक्ती केली जात असली, तरी त्यांच्यावर कायमस्वरूपी शिक्षकांप्रमाणे सर्व जबाबदाऱ्या सोपविता येत नसल्याने समस्या कायम असल्याचे चित्र आहे.

Teachers
Pimpri Contract Worker Death: रोषणाईच्या माळा काढताना गच्चीवरून पडला; पिंपरीत कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

यू-डायसवरच्या संख्येनुसार पालिका शाळांत बालवाडी ते दहावीपर्यंत एकूण ५७ हजार ५९१ विद्यार्थी आहेत. महापालिका मानधनावर शिक्षक नेमते. मात्र, ही व्यवस्था तात्पुरती असते. मानधनावरील शिक्षकांना कायमस्वरूपी शिक्षकांप्रमाणे सर्व प्रशासकीय व शैक्षणिक जबाबदाऱ्या सोपविता येत नाहीत. त्यामुळे उपलब्ध कायमस्वरूपी शिक्षकांवर अतिरिक्त ताण येतो. याशिवाय, मानधनावरील शिक्षकाने नोकरी अर्धवट सोडल्यास विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडतो.

Teachers
Chakan MIDC Traffic Congestion: चाकणच्या वाहतूक कोंडीवर प्रशासनाचा ‘ॲक्शन प्लॅन’; ३१ ऑगस्टची डेडलाइन, पार्किंगला पूर्ण बंदी

नव्या शिक्षकाच्या नियुक्तीपर्यंत अध्यापनाची जबाबदारी अन्य शिक्षकांवर सोपवावी लागते. परिणामी विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्यासाठी आवश्यक असलेले सातत्य मिळत नसल्याची पालकांची तक्रार आहे. पदे रिक्त असतानाच कार्यरत शिक्षकांवर विविध अशैक्षणिक कामांची जबाबदारी सोपविली जाते. त्याचा परिणाम वर्गातील अध्यापनावर होतो. विविध शासकीय उपक्रम, सर्वेक्षणे, निवडणूकविषयक कामे आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे तासिका कमी होतात.

Teachers
Indrayani Flood Line Illegal Constructions: इंद्रायणीच्या निळ्या पूररेषेतील २० अनधिकृत बांधकामे पाडा; NGTचा महापालिकेला आदेश

गुणवत्तावाढीबरोबर शिक्षकांचीही गरज

महापालिका शाळांमध्ये डिजिटल शिक्षण, विविध शैक्षणिक उपक्रम आणि पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. मात्र, वर्गात शिकविण्यासाठी आवश्यक संख्येने शिक्षक उपलब्ध नसतील, तर या सुविधांचा अपेक्षित परिणाम साधणे कठीण आहे. त्यामुळे मानधनावरील तात्पुरत्या व्यवस्थेऐवजी शिक्षकांची रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील सातत्य कायम ठेवण्यासाठी प्रशासन याबाबत काय निर्णय घेणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

Teachers
PMPML Online Ticket Service: पीएमपीच्या ऑनलाइन तिकीट सेवेला तांत्रिक ‘ब्रेक’; पैसे वजा होऊनही तिकीट मिळेना

महापालिकेच्या शाळांमध्ये रिक्त शिक्षकांच्या जागांवर मानधनावरील शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच रिक्त जागांची पवित्र पोर्टलवरही नोंदणी केली आहे.

संगीता बांगर (प्रशासन अधिकारी, पिं.चि.मनपा)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news