Pimpri Chinchwad School Fire Certificate: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड नाही! शाळा, महाविद्यालये, क्लासेसना 'फायर सर्टिफिकेट' बंधनकारक

अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर नियमानुसार कारवाई होणार; ऑनलाईन नोंदणीसाठी QR कोड उपलब्ध, आयुक्तांचे संस्थाचालकांना आवाहन.
Pimpri Chinchwad School Fire Certificate
Pimpri Chinchwad School Fire CertificatePudhari
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण केंद्रे अशा विविध शैक्षणिक संस्थांसाठी अग्निसुरक्षा नोंदणी आणि अग्नी सुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र (फायर सर्टिफिकेट) बंधनकारक आहे. संबंधित शैक्षणिक संस्थांनी अग्निशमन विभागामध्ये ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अधिकृत फायर सर्टिफिकेट घ्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. सर्टिफिकेट नसल्यास महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे.

Pimpri Chinchwad School Fire Certificate
Dighi Son FIR Old Father: वृद्ध पित्याची देखभाल नाही, मालमत्ताही हडपली!

कोणतीही शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लास, अकादमी किंवा प्रशिक्षण केंद्र हे अग्निसुरक्षेच्या नियमांपासून मुक्त नाही. अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, फायर अलार्म प्रणाली तसेच, प्रशिक्षित कर्मचारी यांची उपलब्धता ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर महापालिकेमार्फत नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

Pimpri Chinchwad School Fire Certificate
Hinjawadi Accident Survivor Testimony: "बस माझ्या दोन फुटांवरून निघून गेली...अन मी थोडक्यात बचावलो!" हिंजवडी अपघाताच्या साक्षीदाराचा थरार

विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अग्निसुरक्षा उपाय असणे गरजेचे आहे. सर्व संस्थांनी निर्धारित नियमांचे पालन करावे. आपला व्यावसायिक वापर असलेला परिसर अग्नी सुरक्षित करणे व ठेवणे ही संबंधित संस्थाचालक व मालक यांची जबाबदारी आहे. शैक्षणिक संस्थेची नोंदणी व आवश्यक अग्नी सुरक्षितता उपाययोजना केल्यास गंभीर दुर्घटना टाळण्यास मोठी मदत होणार आहे.

Pimpri Chinchwad School Fire Certificate
Hinjawadi School Bomb Threat: हिंजवडीत महिंद्रा इंटरनॅशनल शाळेत बॉम्बची धमकी; ई-मेलने आयटी परिसरात खळबळ, विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी हलवले

महापालिकेने फायर सर्टिफिकेटकरिता तपासणी, नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. ही सुविधा noncoreerp. pcmcindia. gov. in/ login संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अग्निशमन विभागामार्फत यासंबंधी क्यूआर कोड प्रसिद्ध केला असून, तो स्कॅन करून आवश्यक कागदपत्रे सादर करून नोंदणी व सर्टिफिकेटसाठी अर्ज करता येणार आहे.

Pimpri Chinchwad School Fire Certificate
Wadgaon Maval Voting: मतदान कक्षातच पूजाअर्चा! नगराध्यक्ष पदाच्या भाजप-राष्ट्रवादी उमेदवारांवर गुन्हा दाखल; वडगाव मावळात आचारसंहितेचा भंग

विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची

शैक्षणिक संस्थांमध्ये दररोज शेकडो विद्यार्थी उपस्थित असतात. त्यांच्या सुरक्षेची हमी देणे ही शैक्षणिक संस्था चालक व मालकांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळेच नोंदणी आणि अधिकृत फायर सर्टिफिकेट प्रत्येक शैक्षणिक संस्थेने घेणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करून नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही संभाव्य दुर्घटनेपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे हे महापालिकेचे ध्येय आहे, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news