Hinjawadi School Bomb Threat: हिंजवडीत महिंद्रा इंटरनॅशनल शाळेत बॉम्बची धमकी; ई-मेलने आयटी परिसरात खळबळ, विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी हलवले

दुपारी मोठा स्फोट होणार, अनोळखी मेल आयडीवरून धमकी; बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकासह पोलिसांचा मोठा ताफा दाखल, सायबर विभागाकडून तांत्रिक तपास सुरू.
Hinjawadi School Bomb Threat
Hinjawadi School Bomb ThreatPudhari
Published on
Updated on

पिंपरी : हिंजवडीतील महिंद्रा इंटरनॅशनल शाळेच्या मेलवर शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मेलची दखल घेत बॉम्ब शोधक नाशक पथकाला पाचारण करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Hinjawadi School Bomb Threat
Shevgaon Leopard Terror: 'बिबटेच बिबटे चोहीकडे, वन खाते गेले कुणीकडे!' शेवगावमध्ये रात्री-दिवसा बिबट्याची दहशत; पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरूच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी शाळेच्या मेलवर एका अनोळखी मेल आयडी वरून एक मेल आला असून यामध्ये शाळेत बॉम्ब ठेवला असल्याचे नमूद आहे. तसेच, दुपारी शाळेत मोठा स्फोट होणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

Hinjawadi School Bomb Threat
Teachers Strike Pune TET: शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एल्गार! प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. ५) राज्यातील सर्व शाळा बंद आंदोलन

दरम्यान, मेल निदर्शनास येताच शाळा व्यवस्थापनाने याबाबत पोलिसांना माहीती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन हिंजवडी पोलीस, श्वानपथक, बॉम्ब शोधक पथकाने तत्काळ शाळेत धाव घेतली. संपूर्ण परिसर सुरक्षित करून शाळेत सर्वत्र तपासणी सुरू आहे. अचानक पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Hinjawadi School Bomb Threat
PCMC Voter List Objections: मतदार याद्यांवर गोंधळ! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे तब्बल ६,८८७ आक्षेप, अनेक इच्छुकांची नावेच गायब

दरम्यान, हा ईमेल कोठून पाठवला गेला? त्यामागील उद्देश काय? याबाबत सायबर विभाग तांत्रिक तपास करत आहे. प्राथमिक तपासाअंती हा ईमेल खोटा असण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी पोलिसांकडून सर्वंकष तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news