PCMC Dengue Cases: पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचा डंख वाढला; जुलैमध्ये ११ रुग्ण पॉझिटिव्ह, मलेरियाचाही शिरकाव

पावसाळी वातावरण, कचरा आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साथीच्या आजारांचा धोका; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
Mosquito
MosquitoPudhari
Published on
Updated on

पिंपरी: शहरासह परिसरात काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळलेले वातावरण, थंड वारे, गारवा या बदलामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकल्यासह अन्य साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीमध्ये मलेरियाचा एक, तर डेंग्यूचे ११ पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Mosquito
PCMC School Dropout Children Survey: एसआयआरच्या कामामुळे शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण रखडले; पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षकांसमोर दोन दिवसांत मोहीम पूर्ण करण्याचे आव्हान

जुलै महिन्यामध्ये मलेरियाच्या २९, १०३ संशयित रुग्णांपैकी १ पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. तर डेंग्यूच्या ४२८ संशयित रुग्णांपैकी ११ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. जून महिन्यामध्ये डेंग्यूचे २ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि शहरातील कचऱ्याच्या समस्येमुळे डांस उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

Mosquito
Visapur Fort Rescue: विसापूर किल्ल्यावर थरारक बचाव मोहीम; जखमी तरुणीला रेस्क्यू टीमने दिले जीवदान

पर्यावरणातील या बदलामुळे प्रकृतीत असंतलून निर्माण होवून काही नागरिक ताप, डोके दुखी, अंग दुखणे, सर्दी, खोकला, वात विकार, हाडे दुखणे आदी आजारांना वाढले असल्यामुळे दवाखाने रुग्णालयात नेहमीपेक्षाही फुल्ल गर्दी दिसत आहे. पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे उघड्या गटारातून वाहणारे पाणी, माश्या, मच्छर, दुर्गंधीमुळे जंतुसंसर्गाने होणार्‍या आजारात वाढ झाली आहे.

Mosquito
Pimpri Chinchwad Garbage Crisis: पिंपरी-चिंचवडवर कचऱ्याचे संकट? लोकसंख्या ५७ लाखांवर जाणार; नियोजनाअभावी भविष्यात मोठी समस्या

तसेच शहरामध्ये उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहेत. यामध्ये जुलाबाच्या रुग्णांमध्ये देखील वाढ झाली आहे. हवेच्या माध्यमातून होणार्‍या संसर्गाने ताप येण्याचे प्रमाण वाढले असून अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे अशा तक्रारींतही वाढ झाली आहे. त्यात बालकांची संख्या लक्षणीय असून, वातावरणातील बदलामुळे रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे लहान बालकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

Mosquito
Dapodi Pimple Gurav Road Repair: दापोडी-पिंपळे गुरव रस्त्यावर पावसाळ्यातच चेंबर दुरुस्ती; रखडलेल्या कामांमुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त

ढगाळ वातावरणामुळे वाताच्या रुग्णही अंगदुखी या सारख्या व्याधीने ग्रस्त झाले आहेत. महापालिकेव्दारे किटकजन्य आजार जसे मलेरिया डेंग्यू होऊ नये यासाठी शाळा, वस्त्या याठिकाणी जनजागृती केली जात आहे. तरी नागरिकांनी बदलत्या वातावरणात कोणताही आजार अंगावर न काढता त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news