PCMC Budget 2026-27: उत्पन्न घटल्याने 2026-27 अर्थसंकल्पात 700 कोटींची घट; नव्या कामांना ब्रेक

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सादर केला 9,322 कोटींचा अर्थसंकल्प; रखडलेली कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: सन 2025-26 या आर्थिक वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे; तसेच बेसुमार खर्च करत असताना, उत्पन्न वाढीकडे लक्ष न दिल्याने महापालिकेची जमा बाजू (उत्पन्न) कोलमडल्याने अर्थसंकल्पात मोठी घट दिसत आहे. परिणामी, सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात नव्या कामांचा समावेश न करता रखडलेली कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे; तसेच महापालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने अनेक कामे व प्रकल्पांचा समावेश करता आला नसल्याची कबुली स्वत: आयुक्तांनीही दिली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pavanathadi Jatra 2026: सांगवीत पवनाथडी जत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीमंत असा नावलौकीक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2026-27 चा मूळ 5 हजार 660 कोटी 72 लाख आणि केंद्र व राज्य शासनाचे अनुदान धरून एकूण 9 हजार 322 कोटी 17 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीचे नवनियुक्त अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्याकडे शनिवार (दि. 28) सादर केला. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक नव्या कामांना तसेच, पूर्वी घोषित केलेल्या कामे व प्रकल्पांना फाटा देण्यात आला आहे. उत्पन्न घटल्याने तसेच, महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने खर्चावर मर्यादा घातल्याचे स्पष्ट होत आहे.

करसंकलन विभागाला सन 2025-26 वर्षात एकूण 1 हजार 50 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, अपेक्षित वसुली न झाल्याने सन 2026-27 साठी त्या विभागाचे उद्दिष्ट कमी करीत 1 हजार कोटी रुपये करण्यात आले आहे. त्याबरोबरीने बांधकाम परवानगी विभागाचेही उत्पन्न यंदा घटले आहे. सन 2024-25 वर्षात बांधकाम परवानगी विभागास 736 कोटी 81 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. सन 2025-26 वर्षांत त्यात घट करून 700 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने सन 2026-27 मध्ये त्याही विभागास केवळ 750 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Dehu Tukaram Beej Sohala 2026: देहूगावात संत तुकाराम महाराज बीजसोहळ्याची भक्तिमय धामधूम

स्थानिक संस्था करातून (एलबीटी) 200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित होते; मात्र, शासनाकडून तो विभागाच बंद करण्यात आल्याने महापालिकेस काहीच निधी मिळालेला नाही. सन 2026-27 मध्ये एलबीटीतून 2 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज बांधण्यात आला आहे. तसेच, सन 2025-26 वर्षात भांडवली जमेत एकूण 1 हजार 31 कोटी 77 लाख रुपये जमा होतील असा अंदाज होता. केवळ 360 कोटी रुपये जमा झाले आहेत. तर, सन 2026-27 वर्षासाठी 201 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

येनकेन प्रकारे सन 2025-26 या आर्थिक वर्षांत उत्पन्न घटल्याने सन 2026-27 वर्षांत महापालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पात नवीन कामांचा समावेश केलेला दिसत नाही. अपूर्ण कामे पूर्ण करण्याभर भर दिला आहे. प्रशासकीय राजवटीत बेसुमार खर्च करण्यात आला. मात्र, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. परिणामी, उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी स्थिती होऊन आर्थिक असमतोल निर्माण झाला आहे.

निधीची चणचण असल्याने कोणतीही नवीन कामे सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची कबुली स्वत: आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. सर्व बाबींचा परिणाम म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल 700 कोटी रुपयांची घट आली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती डळमळीत असल्याने नव्या आणि खर्चिक कामांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Talegaon Dabhade Municipal Budget 2026: तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे 458 कोटींचे अंदाजपत्रक सादर

निधी नसल्याने मोठे प्रकल्प नाहीत

करसंकलन, बांधकाम परवानगी तसेच, विविध विभागांचे वर्षभरातील उत्पन्न घटले आहे. तसेच, शासनाकडून मिळणारे अपेक्षित अनुदान कमी प्रमाणात मिळाले. महापालिका निवडणूक आचारसंहितेमुळे काम करता आले नाही. करसंकलन विभागाचे सर्व कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होते. या कामात तीन ते चार महिने वाया गेले; तसेच जमिनीची कब्जा हक्क मोजणी बंद असल्याने बांधकाम परवानगीसाठी प्रकरणे येणे बंद झाले होते. ऑक्टोबरनंतर ती मोजणी सुरू झाल्याने आता बांधकाम परवानगीची प्रकरणे वाढतील, त्यातून महापालिकेचे उत्पन्न वाढले, असा आशावाद करत, निधी उपलब्ध नसल्याने मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले नाहीत, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

महापौर निधी पुन्हा सुरू

प्रशासकीय राजवटीत महापौर निधी बंद करण्यात आला होता. यंदा अर्थसंकल्पात महापौर निधीसाठी तब्बल 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या माध्यमातून शहरातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना 5 हजारांची वैद्यकीय मदत मिळणार आहे. तसेच, महापौरांना शहरभरात विशेष कामे करता येणार आहेत.

बंद पडलेल्या स्मार्ट सिटीसाठी 50 कोटींचा निधी

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी 31 मार्च 2026 ला बंद करून गुंडाळण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीची सर्व कामे महापालिकेच्या संबंधित विभागांकडे वर्ग केली जाणार आहेत. स्मार्ट सिटीचे ऑटो क्लस्टर येथील कार्यालयही बंद केले जाणार आहे. असे असताना स्मार्ट सिटीसाठी 50 कोटींची तरतूद केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Raghuvir Tukaram Khedkar Honour: पिंपरी-चिंचवडमध्ये पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर यांचा नागरी सन्मान

स्थायी समिती कोणत्या कामांना कात्री लावणार, कोणती कामे सुचवणार याकडे लक्ष

आयुक्तांनी सन 2026-27 चा अर्थसंकल्प तयार केला आहे. त्याला स्थायी समितीकडून उपसूचना देण्यात येणार आहे. स्थायी समितीकडून कोणत्या कामांना कात्री लावली जाणार आहे. तसेच, कोणती कामे सुचविली जाणार याकडे लक्ष लागले आहे. त्यावरुन नगरसेवकांमध्ये रुसवे व फुगवे पाहण्यास मिळणार आहेत.

जुनीच कामे पुन्हा

  • चिंचवड येथील नवीन महापालिका भवन

  • पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाण पूल

  • सातशे बेडचे मोशी सुपरस्पेशिलिटी रुग्णालय

  • थेरगाव येथील कॅन्सर रुग्णालय

  • पिंपरीतील अग्निशमन प्रबोधिनी

  • मामुर्डी-सांगवडे पूल

  • ड्रेनेजचा मास्टर

  • आराखडा

  • चिंचवड येथील पीसीएमसी सिटी सेंटर

  • नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम

  • हरित सेतू

  • भामा आसखेड पाणी योजना

  • डुडुळगाव पंतप्रधान आवास योजना

  • प्राधिकरणातील मदनलाल धिंग््राा मैदानात नवीन क्रीडा संकुल

  • वाकड येथील बॅडमिंटन कोर्ट

  • तळवडेतील बायोडायर्व्हसिटी पार्क

  • पिंपळे सौदागर येथील वेस्ट टू वंडर पार्क

  • मुळा व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प

  • मोशी कचरा डेपोतील जुन्या डंपिंग केलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग

  • मोशी कचरा डेपोतील ओल्या कचऱ्यापासून सीएनजी तयार करणे

  • सांडपाण्याचे पुनर्चक्रीकरण व पुनर्वापर

  • आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील खाऊ गल्ली (नावात बदल सखी आंगण)

  • शिक्षण विभागाकडून जल्लोश शिक्षणाचा, शालेय साहित्य खरेदी, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी भारत दर्शन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news