Pavanathadi Jatra 2026: सांगवीत पवनाथडी जत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

झणझणीत मराठमोळ्या जेवणाची मेजवानी; हस्तकला, खरेदी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत
Pavanathadi Jatra 2026
Pavanathadi Jatra 2026Pudhari
Published on
Updated on

दापोडी: अनेक शोभेच्या वस्तू, पारंपरिक आधुनिक कृत्रिम दागिने, हस्तकलेच्या बॅगा, पर्स, गृहोपयोगी वस्तू, उन्हाळी पदार्थ, विविध मसाले, लोणचे, पापड, चटण्या नाश्त्याचे विविध पदार्थ व जेवणासाठीही अस्सल मराठमोळे, शाकाहारी, मांसाहारी पदार्थ अशा वैविध्यपूर्णतेने पवनाथडी जत्रा सजली आहे. या जत्रेत झणझणीत जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे.

Pavanathadi Jatra 2026
Dehu Tukaram Beej Sohala 2026: देहूगावात संत तुकाराम महाराज बीजसोहळ्याची भक्तिमय धामधूम

सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर रविवारपर्यंत नागरिकांना जत्रेचा आनंद घेता येणार आहे. जत्रेत विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांची भरपूर प्रमाणात दुकाने, स्टॉल्स आहेत. याशिवाय सायंकाळी नागरिकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. महिलांना रोजच्या वापरासाठी लागणारे साहित्य व इतर साहित्य उपलब्ध आहे.

Pavanathadi Jatra 2026
Talegaon Dabhade Municipal Budget 2026: तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे 458 कोटींचे अंदाजपत्रक सादर

टॉप, लेगिन्स, पर्स, बॅगांची खरेदी महिला करत आहेत. स्वतःच्या खरेदी बरोबर आपल्या घरासाठी मिरल, कॉफ पेंटिंग्स, वारली पेंटिंग्स, वाल पेंटिंग्स, की होल्डर विणलेले तोरण, ताटावरचे विणलेले रुमाल अशा महिलांनी स्वतः बनविलेल्या वस्तू व इतर गृहोपयोगी वस्तू उपलब्ध आहेत. जेवणासाठी विविध मसाले आहेत. शुभेच्छापत्रे, लहान मुलांची खेळणी, सौंदर्यप्रसाधने, सुखी मासळी विविध वस्तू जत्रेत उपलब्ध आहेत.

Pavanathadi Jatra 2026
Raghuvir Tukaram Khedkar Honour: पिंपरी-चिंचवडमध्ये पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर यांचा नागरी सन्मान

नागरिकांना घेता येणार यांचा आस्वाद

मनसोक्त खरेदी झाल्यावर ताजेतवाने होण्यासाठी नाश्त्याचे अनेक पदार्थ खवय्यांना खुणवतात. उडीद वडा, इडली सांबर, पावभाजी, आप्पे, डोसा, सँडविच, शेगाव कचोरी आणि अगदी भेळ, वडापावसारखे विविध पदार्थ आहेत. चुलीवरच्या मराठमोळ्या झणझणीत जेवणाची लज्जत चाखण्यासाठी शाकाहारी व मांसाहारी जेवणाचे स्टॉल सज्ज आहेत.

Pavanathadi Jatra 2026
Pimpri Holi Market 2026: पिंपरीत होळी बाजाराची धूम; कलर टॅंक, छत्री अन् इलेक्ट्रिक गनची क्रेझ

वरण-भात, झुणका भाकरी, वांग्याचे भरीत, भाकरी, मासवडी या स्पेशल कोल्हापुरी पद्धतीचे जेवण, खानदेशी मांडेसोबत आमटी भात, भाजणीचे थालीपीठ, चिकन बिर्याणी, चिकन वडे, कोंबडीचा रस्सा, पापलेट फाय, सुरमई फाय, कोळंबी पकोडे, सुरमई करी, अंडा करी, खिमा भजी, खिमा पाव, खिमा करंजी, हे सारे पदार्थ खवय्यांना तृप्त करणार आहेत. सोलकढी, खपली गव्हाची खीर, सुरळीची वडी, कोथिंबीर वडी, मंचुरियन, पुरणपोळी, गुळपोळी, उकडीचे मोदक या प्रसिद्ध पदार्थांची चवही येथे चाखायला मिळणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागातील खाद्य संस्कृती आपल्याला अनुभवता येणार आहे. याबरोबर संस्कृती कार्यक्रमांची मेजवानी पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news