Public safety PCMC: महापालिकेच्या जागांवर झुले, राईड्स लावण्यास बंदी; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आयुक्तांचा निर्णय

अनधिकृतपणे अशा प्रकारची खेळणी लावली जाणार नाहीत, याबाबत महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकारी व संबंधित अधिकार्‍यांनी दक्षता घ्यावी
महापालिकेच्या जागांवर झुले, राईड्स लावण्यास बंदी; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आयुक्तांचा निर्णय
महापालिकेच्या जागांवर झुले, राईड्स लावण्यास बंदी; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आयुक्तांचा निर्णयPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची मैदाने, उद्याने, मोकळ्या व आरक्षित जागांमध्ये झुले, गोलचक्रे, ट्रॅम्पोलिन, फुग्यांची घरे, विविध राईड्स अशा विविध प्रकारच्या मनोरंजनांची व खेळांची साधने लावण्यास बंदी आहे.

त्याबाबत महापालिकेकडून परवानगी दिली जाणार नाही. त्या जागांवर अनधिकृतपणे अशा प्रकारची खेळणी लावली जाणार नाहीत, याबाबत महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकारी व संबंधित अधिकार्‍यांनी दक्षता घ्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. (Latest Pimpri News)

महापालिकेच्या जागांवर झुले, राईड्स लावण्यास बंदी; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आयुक्तांचा निर्णय
Court Building: न्यायालय इमारतीचे बांधकाम संथ गतीने; 40 टक्के काम पूर्ण

पिंपरी-चिंचवड शहरात नागरिक, संस्था यांच्यामार्फत विविध उत्सव, प्रदर्शने यासाठी महापालिकेच्या मोकळ्या व आरक्षित जागा, मैदाने, उद्याने आदी भाड्याने घेण्यात येतात. या ठिकाणी नागरिक, लहान मुले जास्तीत जास्त संख्येने यावीत, यासाठी तेथे झुले, गोलचक्रे, ट्रॅम्पोलिन, फुग्यांची घरे, विविध राईड्स अशा प्रकारचे विविध मनोरंजनांची व खेळांची साधने लावली जातात.

सध्या अशा प्रकारे खेळांची साधने लावणे, दिवे लावणे, शोभेची लाईटिंग करणे याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयामार्फत संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील महापालिकेच्या मोकळ्या किंवा आरक्षित जागा विविध कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्याची परवानगी दिली जाते. यामध्ये काही ठिकाणी कार्यक्रमाबरोबर विविध यांत्रिक मनोरंजन खेळांची साधने लावली जातात.

मात्र, या साधनांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर समस्या निर्माण होत आहेत. अनेकदा काही कार्यक्रमांमध्ये मनोरंजनाच्या खेळांची साधने तुटून अपघात घडल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यात जिवित व वित्त हानी झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून अशा प्रकारे खेळांची साहित्य वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. महापालिकेची मैदाने, उद्याने, मोकळ्या आणि आरक्षित जागांमध्ये अशी खेळणी उभारण्यास बंदी घालण्यात आली आहे.

वाहतुकीस अडथळा

झुले, गोलचक्रे, फुग्यांची घरे आदी अनेक उपकरणे अपुरी देखभाल, निकृष्ट दर्जा किंवा अपात्र कर्मचार्‍यांद्वारे चालवली जातात. यामुळे लहान मुलांना दुखापतींचा मोठा धोका संभवतो. काही जण मोकळ्या जागांशिवाय मनोरंजनाची उपकरणे उभारून तिकीट आकारणी करतात. यामुळे सार्वजनिक जागेचा अनधिकृतपणे व्यावसायिक वापर होतो. यांत्रिक मशीन्स किंवा खेळणीची उभारणी करताना अपघात होऊ नये यासाठी योग्य डिझाईन (स्ट्रक्चर) करण्याबाबत काळजी घेतली जात नाही.

महापालिकेच्या जागांवर झुले, राईड्स लावण्यास बंदी; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आयुक्तांचा निर्णय
Illegal cattle transport: जनावरांच्या अवैध वाहतुकीवर गोरक्षकांचा ‘वॉच’; सव्वा वर्षात तब्बल 2,391 गुन्हे नोंद

खेळण्याच्या उपकरणांनी व्यापलेल्या जागेमुळे नागरिकांच्या चालण्याच्या, व्यायामाच्या, बसण्याच्या किंवा मैदानी खेळ खेळण्याच्या जागेवर मर्यादा येतात. काही ठिकाणी झुले किंवा खेळणी रस्त्यालगत उभारले जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अपघाताचा धोका वाढतो. योग्य स्वच्छतेची व निर्जंतुकीकरणाची व्यवस्था नसल्याने अशा उपकरणांचा वापर केल्याने लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका असतो. फुग्यांची घरे, स्पीकर लावून चालवले जाणारे खेळ, कर्णकर्कश संगीत आदींमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होतो. त्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news