Court Building: न्यायालय इमारतीचे बांधकाम संथ गतीने; 40 टक्के काम पूर्ण

फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
Pimpri News
न्यायालय इमारतीचे बांधकाम संथ गतीने; 40 टक्के काम पूर्ण Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: मोशी येथील जिल्हास्तरीय न्यायालयाचे बांधकाम संथगतीने सुरू असून, आत्तपर्यंत केवळ 40 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. 3 मार्च 2024 रोजी येथील इमारतीच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. आता जवळपास दीड वर्ष उलटूनदेखील कामाने वेग घेतलेला दिसून येत नाही. प्रत्यक्षात फेबु्रवारीत ते काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कामाची गती लक्षात घेता, उरलेल्या 60 टक्के कामाला आणखी वर्षे उजाडेल.

दरम्यान, मध्यंतरी निधीअभावी रखडलेले कामाला ठेकेदाराला सार्वजनिक विभागाकडून कानउघाडणी करण्यात आली. मोशी येथील सेक्टर नंबर 14 मध्ये 15 एकर जागेमध्ये पिंपरी-चिंचवड न्याय संकुलाच्या इमारतीचे चौथ्या टप्प्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 25 न्यायालये उभारण्यात येणार आहे. (Latest Pimpri News)

Pimpri News
Illegal cattle transport: जनावरांच्या अवैध वाहतुकीवर गोरक्षकांचा ‘वॉच’; सव्वा वर्षात तब्बल 2,391 गुन्हे नोंद

दरम्यान, डिसेंबर 2025 पर्यंत हे काम पूर्ण होण अपेक्षित असताना त्यानंतर फेबु्रवारीची तारीख देण्यात आली. मात्र, तीदेखील गाठणे अवघड आहे. मध्यंतरी या बांधकामास अडथळा आला होता. यानंतर ज्येष्ठ वकील आणि पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेटस् असोसिएशनच्या माध्यमातून मंत्रालयातून पाठपुरावा करण्यात आला.

त्यानुसार वित्त व निधी विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. तसेच, सार्वजनिक विभागाकडूनदेखील कामाची गती वाढविण्याबाबत या शिष्टमंडळास आश्वासन देण्यात आले. नेहरुनगर येथील महापालिकेच्या इमारतीत न्यायालयाचे कामकाज सुरू आहे.

मात्र, न्यायालयाच्या हक्काच्या जागेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून वकील संघटना आणि बार असोसिएशन पाठपुरावा करत आहे. सध्याच्या जागेसाठी जवळपास साडेसात लाख रुपये महिन्याकाठी भाडे भरावे लागत आहे. ते भाडे सार्वजनिक बांधकाम भरते. तर, दुसरीकडे इमाारतीचे काम लवकर होत नसल्याने आणखी काही महिने भाडे भरण्याची वेळ येणार आहे.

Pimpri News
Pune Modak Rate: बाप्पासाठी गुलकंद, चॉकलेट अन् पनीर मोदक, पुणे- पिंपरीतले दर किती?

अशी आहे स्थिती

एकूण क्षेत्र: 15 एकर

बांधकाम: तळमजला, 4 मजले

सध्याचे काम: 40 टक्के

कामाची मुदत: 24 महिने

अंदाजे रक्कम: 124 कोटी

अंतिम तारीख: फेब्रुवारी 2026

न्यायालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे. बांधकामाची गती वाढवली असून, वेळेत काम पूर्ण होण्यासाठी मनुष्यबळात वाढ करण्याबात कळवले आहे. वेळेत काम पूर्ण होण्यााबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- संजय नगराळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news