Pimpri Chinchwad Voter List Verification: पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार यादी पडताळणीला सुरुवात! बीएलओ 29 जुलैपर्यंत घरोघरी पोहोचणार

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात सखोल पुनरीक्षण मोहीम; मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन
Voter List
Voter ListPudhari
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदारांचे मतदार यादीतील नावे पडताळणीस मंगळवारी (दि. 30) सुरुवात करण्यात आली. घरोघरी जाऊन त्यांना अर्जाचे वाटप केले जात आहे. तसेच, भरलेले अर्ज जमा करण्यात येत आहेत. ते पडताळणी 29 जुलैपर्यंत केली जाणार आहे.

Voter List
PCMC Property Tax Collection: पिंपरी-चिंचवड महापालिकेने पहिल्या तिमाहीत 526 कोटी मालमत्ता कर वसूल; 4.45 लाख नागरिकांचा सहभाग

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम (एसआयआर) मंगळवारपासून सुरू करण्यात आला आहे. बीएलओकडून मतदान केंद्रानुसार त्या त्या भागांतील घरोघरी जाऊन मतदारांना अर्जाचे वाटप करण्यात येत आहे.

Voter List
Indrayani River Rejuvenation Project: इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला मंजुरी; 430 कोटींचा आराखडा, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय

तसेच, भरलेले अर्ज जमा केले जात आहेत. घरोघरी जाऊन अर्जाचे वाटप तसेच, अर्ज जमा करण्याची मुदत 29 जुलैपर्यंत आहे. मतदार यादी 5 ऑगस्टला तयार केली जाणार आहे. त्यावर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालाधीत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. त्यावर 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर या कालावधीत सुनावणी होणार आहे. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.

Voter List
Maharashtra Solar Grid Support Charges: सोलर प्रकल्पावर ‘ग्रीड सपोर्ट चार्जेस’ आकारणी; शेतकऱ्याचा महावितरणवर प्रश्नचिन्ह

मतदार यादीत नाव असल्याची खात्री करा

नागरिक अधिक माहितीसाठी मोबाईलमध्ये ईसीआयएनईटी हे अ‍ॅप डाउनलोड करून आपल्या बीएलओशी संपर्क करू शकतात. आपले नाव मतदार यादीत शोधण्यासाठी https://electoralsearch.eci.gov.in, https://voters.eci.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Voter List
Pimpri Water Tanker Crisis: पाणीटंचाईमुळे खराळवाडीसह उपनगरांत टँकर मागणीत वाढ; दरात 60% पर्यंत वाढ

घरी येणार्‍या बीएलओ कर्मचार्‍यांना आवश्यक माहिती द्या

नागरिकांनी आपल्या कुटुंबातील पात्र मतदारांची नोंदणी व माहिती अद्ययावत असल्याची खात्री करावी. आपल्या घरी येणार्‍या बीएलओ कर्मचार्‍यांना आवश्यक ती माहिती व कागदपत्रे देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी अर्चना यादव यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news