World Book Day: स्क्रीनच्या जगात पुस्तकांचा सुगंध: वाचनाचे वेड अजूनही कायम

स्नेहवनमध्ये ‌‘वन बुक-वन मूवी‌’
World Book Day
World Book DayPudhari
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी : डिजिटल युगात पुस्तकांशी मुलांचे नाते दुरावत चालले आहे. सध्या मुलांना फक्त मोबाईल, टीव्ही आणि गेम्सचे व्यसन जडले आहे. पुस्तके वाचनात आलीच तर फक्त अभ्यासक्रमाची तेही फक्त परीक्षा देण्यापुरतीच अशी सध्याची परिस्थिती; मात्र ‌‘वाचाल तर वाचाल‌’ या घोषवाक्यानुसार पुस्तक वाचन हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे.

यामुळे शालेय जीवनातच मुलांना पुस्तक वाचनाची आवड लागल्यास आयुष्यभर त्याचा फायदा होतो. त्यानुसार, स्नेहवन संस्थेचे संस्थापक अशोक देशमाने यांनी विद्यार्थ्यांसाठी ‌‘वन बुक, वन मूवी‌’ हा उपक्रम सुरू केला आहे.

World Book Day
PCMC 52 Crore Scam: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 52 कोटींचा बोगस उपसूचना घोटाळा उघड

आळंदीतील कोयाळी याठिकाणी असलेल्या स्नेहवनमध्ये गेल्या दहा वर्षांपासून एक सुंदर आणि परिणामकारक उपक्रम राबवला जातो ‌‘वन बुक, वन मूवी‌’. या उपक्रमाचा उद्देश मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि त्यातून त्यांचा सर्वांगीण विकास घडवणे हा आहे.

याअंतर्गत, प्रत्येक मुलाने आठवडाभरात एक पुस्तक पूर्ण वाचायचे. पुस्तक मराठी असो किंवा इंग्लिश, ते मुलांच्या क्षमतेनुसार निवडले जाते. आठवड्याच्या शेवटी, म्हणजे शनिवार आणि रविवार, ‌‘रिंगण ॲक्टिव्हिटी‌’ आयोजित केली जाते.

या रिंगण ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक मुलाला त्याने वाचलेल्या पुस्तकाचा सारांश सांगावा लागतो. त्यामध्ये त्यांना काय समजले, कोणते नवीन ज्ञान मिळाले, कोणती शिकवण मिळाली आणि पुस्तकातील एखादी मजेशीर गोष्ट हे सगळे ते आत्मविश्वासाने इतरांसमोर मांडतात. यामुळे त्यांच्या विचारशक्ती, अभिव्यक्ती कौशल्य आणि आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होते.

एखाद्या मुलाने आठवड्यात पुस्तक वाचून पूर्ण केल्यास तर त्याला प्रोत्साहन म्हणून एक प्रेरणादायी चित्रपट दाखवला जातो. या चित्रपटांमधूनही मुलांना जीवनमूल्ये, प्रेरणा आणि नवे विचार मिळतात.

World Book Day
Baramati-Rahuri By Election Voting: बारामती, राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज मतदान

स्नेहवनमध्ये सुमारे 15,000 पुस्तकांचे समृद्ध ग्रंथालय आहे. यामध्ये विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच, वेगवेगळ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांवर आधारित खास कॉर्नर्सही तयार करण्यात आले आहेत जसे की स्वामी विवेकानंद कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज कॉर्नर आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम कॉर्नर. या ठिकाणी संबंधित व्यक्तींची प्रेरणादायी पुस्तके ठेवलेली आहेत.

याशिवाय, मुलांना इंग्लिशची गोडी लागावी म्हणून एक स्वतंत्र ‌‘इंग्लिश कंटेनर‌’ तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये 10,000 हून अधिक इंग्लिश पुस्तके आहेत. तसेच भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यांसारखी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ज्ञान देणारी पुस्तकेही उपलब्ध आहेत.

तसेच स्नेहवनमध्ये विषयानुसार पुस्तके ठेवण्याची एक विशेष पद्धत आहे. परीक्षा स्पर्धा आणि सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध आहेत. शिलाई संबंधित पुस्तके मशीन हॉलमध्ये ठेवलेली आहेत, मशीनशी संबंधित तांत्रिक पुस्तके मशीन हॉलमध्येच आहेत, संगीत रूममध्ये संगीताशी संबंधित पुस्तके ठेवलेली आहेत, तर सायन्स लॅबमध्ये विज्ञान विषयक पुस्तके उपलब्ध आहेत. अशा प्रकारे प्रत्येक कंटेनर आणि विभागामध्ये त्याच्याशी संबंधित पुस्तके ठेवली जातात.

स्नेहवनमध्ये पुस्तकांची मांडणीही अतिशय विचारपूर्वक केली जाते. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कोपऱ्यात पुस्तके ठेवलेली आहेत, कारण ‌‘जे डोळ्यासमोर दिसते, तेच मुलं करतात‌’ या तत्त्वावर विश्वास ठेवून ही रचना करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांच्या नजरेस पुस्तक पडताच सहजपणे ते उचलून वाचायला सुरुवात करतात.

याचबरोबर, मुलांना बाहेरील जगात काय चालले आहे, याची जाणीव व्हावी आणि त्यांना बाहेरच्या जगाचे ज्ञान मिळावे, यासाठी स्नेहवनमध्ये दररोज वर्तमानपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

विद्यार्थिनीचे मनोगत

माझं नाव एकता कदम आहे. मी सध्या चौथीत शिकत आहे. स्नेहवनमध्ये राहून मी खूप पुस्तके वाचली आहेत. मला दररोज पुस्तक वाचण्याची सवय लागली आहे. पुस्तक वाचल्यामुळे आता मी स्वतः कविता लिहिते. मला कविता बनवण्याचा छंद लागला आहे आणि मला कविता लिहायला खूप आवडते. आतापर्यंत मी दहा कविता तयार केल्या आहेत.

आमच्याकडे मुलांना वाचन करण्यासाठी प्रोत्साहन देणे, वाचन करून त्यांची आवड वाढवणे या गोष्टी केल्या जातात. दर शनिवार, रविवारी एकत्रित वाचन उपक्रम असतो. यातून मुलांना गोष्ट ऐकणे, गोष्ट सांगणे याची आवड निर्माण होते. तसेच मुलांच्या ज्ञानात भर पडायला मदत होते. या संपूर्ण उपक्रमामुळे मुलांमध्ये वाचनाची सवय लागते, त्यांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

अशोक देशमाने (संस्थापक, स्नेहवन)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news