No Number Plate Vehicles: विनानंबर प्लेट गाड्या दामटवण्याचा ट्रेन्ड! विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्याची गरज

No Number Plate Vehicles
विनानंबर प्लेट गाड्या दामटवण्याचा ट्रेन्ड! विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्याची गरजPudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात लाखो वाहनांची दैनंदिन वर्दळ आहे. मात्र, अलीकडे रस्त्यांवर नंबर प्लेटशिवाय गाड्या दामटवण्याचा नवा ट्रेंड वाढत चालला आहे. त्यामुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळण्याची भीती व्यक्त होत आहे. यातील विशेष बाब म्हणजे या गंभीर प्रकाराकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे.

दोन्ही नंबर प्लेट गायब

मागील काळात पिंपरी, चिंचवड, चिखली, चाकण भोसरी, निगडी, वाकड, हिंजवडी या परिसरांत नंबर प्लेट काढून दुचाकी चालवल्याचे दिसून आले आहे. काही गाड्यांवर दोन्ही नंबर प्लेट मुद्दाम लावलेली नसल्याचे तरुणांनी बिनधास्तपणे सांगितले. (Latest Pimpari chinchwad News)

No Number Plate Vehicles
Ekvira Temple: एकवीरा मंदिर येथे उभारणार सभा मंडप; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संकल्प

ओळख लपविण्याचा उद्देश

गुन्हेगार आपली ओळख लपवण्यासाठी मुद्दाम गाड्यांची नंबर प्लेट काढतात. पोलिस तपासणी, सीसीटीव्ही किंवा ई-चलनाच्या कॅमेऱ्यांपासून बचाव हा मुख्य हेतू असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, तरुणाईत मात्र कॅमेरातून पावती पडू नये, म्हणून ही मस्टाईलफ वापरले जात असल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे.

सीसीटीव्ही, ई-चलन यंत्रणा निष्प्रभ

गाडीला पुढे मागे नंबर प्लेट नसल्याने पोलिसांसमोर सुसाट गाडी निघून गेली तरीदेखील त्यांना फोटोवरून ओळख पटवता येत नाहीत; तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गाडी कैद झाली तरीदेखील नंबर दिसत नसल्याने दंडाची पावती पडत नाही. त्यामुळे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली सीसीटीव्ही यंत्रणा निष्प्रभ ठरत आहे.

No Number Plate Vehicles
Pradhan Mantri Awas Yojana: ‘पंतप्रधान आवास‌’चा खर्च वाढला; डुडुळगाव प्रकल्पासाठी 52 लाखांचा अतिरिक्त खर्च

कायदा मोडण्याचे प्रोत्साहन ?

राजरोसपणे विनानंबर प्लेटच्या गाड्या रस्त्यावर फिरत असल्याने कायद्याचा धाक उरत नाही. इतरांनाही नंबर प्लेटचे महत्व वाटत नाही. विनानंबर प्लेट गाड्या फिरवणाऱ्यांवर म्हणावी अशी कारवाई होत नसल्याने कायदा मोडण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहनच मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

कायदेशीर बाजू

वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहनावर पुढे व मागे स्पष्ट दिसतील अशा नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. हा नियम मोडल्यास पहिल्या वेळी 500 रुपये दंड आणि वारंवार उल्लंघन केल्यास 1,500 ते 5,000 रुपयांपर्यंत दंड आहे. तसेच, यामध्ये वाहन जप्त करण्याचीदेखील कारवाई करता येते.

विमा कंपनी नाकारू शकते भरपाई

विनानंबर प्लेट दुचाकी फिरवत असताना अपघात झाल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कारण अपघाताच्या वेळी नंबर प्लेट नसल्यास विमा कंपनी नुकसानभरपाई नाकारू शकते.

विना नंबर प्लेटचे गंभीर परिणाम

  • नंबर प्लेटशिवाय गाड्या चालवण्यामुळे शहरातील सुरक्षिततेला गंभीर धोका

  • चोरी, चेन स्नॅचिंग, मारामारी यासह गंभीर गुन्ह्यांत वाहनांमुळे पोलिसांना मोठा धागा सापडतो. नंबर प्लेट नसल्याने आरोपींची ओळख पटवणे कठीण होते.

  • अपघात घडल्यास दोषी गाडीसह चालक पळून गेल्यास पीडिताकडे पुरावा राहत नाही.

नंबर प्लेटशिवाय गाड्या चालवणाऱ्यांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू आहे. मात्र, अलीकडे काही तरुण मस्टाईलफ म्हणून नंबरप्लेट काढून ठेवत असल्याचे समोर आले आहे. या प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

- डॉ. विवेक पाटील, उपायुक्त, वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड.

नंबर प्लेटशिवाय वाहन म्हणजे घराला दरवाजा न लावल्यासारखे आहे. शहरात स्मार्ट सीसीटीव्ही, ई-चलन कॅमेरे असले तरी नंबरप्लेट नसल्याने ही यंत्रणा कुचकामी ठरते. यामुळे गुन्हेगारांना सरळ मोकळा रस्ता मिळतो. ही प्रवृत्ती थांबवली नाही, तर गुन्हेगारीच्या आकडेवारीत थेट वाढ होऊ शकते.

- संदीप कुलकर्णी, पिंपरी- चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news