Ekvira Temple: एकवीरा मंदिर येथे उभारणार सभा मंडप; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संकल्प

या वेळी त्यांनी नैवेद्य आणि महावस्त्र देवीला अर्पण केला; तसेच मंदिराच्या पायथ्याशी आमदार निधीतून सभामंडप उभारणार असल्याचे सांगितले.
Ekvira Temple
एकवीरा मंदिर येथे उभारणार सभा मंडप: डॉ. नीलम गोऱ्हे Pudhari
Published on
Updated on

लोणावळा: एकवीरा मातेच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराला विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवरात्रीनिमित्त मंगळवार (दि. 23) भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी त्यांनी नैवेद्य आणि महावस्त्र देवीला अर्पण केला; तसेच मंदिराच्या पायथ्याशी आमदार निधीतून सभामंडप उभारणार असल्याचे सांगितले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, येथे वाहनतळाचा प्रश्न, खड्डेमय रस्ते आणि भाविकांच्या सुविधेशी निगडित अनेक कामे अद्याप प्रलंबित आहेत. पीएमआरडीए आणि एमएमआरडीएने काही प्रमाणात लक्ष घातले असले तरी अधिक समन्वय साधून ही कामे वेगाने पूर्ण होणे गरजेचे आहे. दिवाळीनंतर विधानभवनात विशेष बैठक घेऊन संबंधित विभागांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यात येणार असून, अनेक वर्षे थांबलेली कामे गतिमान करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Latest Pimpari chinchwad News)

Ekvira Temple
Pradhan Mantri Awas Yojana: ‘पंतप्रधान आवास‌’चा खर्च वाढला; डुडुळगाव प्रकल्पासाठी 52 लाखांचा अतिरिक्त खर्च

शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार, एकवीरा देवी मंदिराच्या पायथ्याशी भाविकांसाठी सभामंडप उभारण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या आमदार निधीतून 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली. पीडब्ल्यूडीकडून ‌‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट‌’ मिळताच या कामाला तातडीने सुरुवात होईल.

Ekvira Temple
Pimpri Crime News: घरफोड्या करणाऱ्या सराईताला अटक; आरोपीवर 103 गुन्हे

या प्रसंगी डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत भगिनी जेहलम जोशी, शिवसेना महिला आघाडी संपर्कप्रमुख कांता पांढरे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, जिल्हा संघटक अंकुश देशमुख, मावळ तालुकाप्रमुख राम सावंत, युवासेनेचे विशाल हुलावळे, युवा सेना जिल्हा उपप्रमुख दत्ता केदारी, ग्रामस्थ मिलिंद बोत्रे, मधुकर पडवळ, पोलिस पाटील अनिल पडवळ, संतोष कुटे, सुरेश गायकवाड, चंद्रकांत भोते, नवनाथ हारपुडे तसेच ग्रामपंचायत सदस्य राजू देवकर, सचिन हुलावळे व सागर हुलावळे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news