Crime News: वॉकी टॉकी वापरून दरोडा; पोलिसांनी 1200 किलोमीटर पाठलाग केला अन् अखेर पकडलेच!

या टोळीतील मुख्य आरोपींचा राजस्थानपर्यंत बाराशे किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी त्यांना अटक केली
pcmc Crime
मुख्य आरोपींचा राजस्थानपर्यंत बाराशे किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी त्यांना अटक केली(File Photo)
Published on
Updated on
  • मोबाईल ट्रेस होऊ नये म्हणून टोळीने वापरली वॉकी टॉकीचा शक्कल

  • तीन आरोपी अटकेत, महिला आरोपीसह तिघांचा शोध सुरू

पिंपरी : शहरातील प्रतिष्ठित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या निगडी प्राधिकरण परिसरात वृद्ध नागरिकाच्या घरात हातपाय बांधून, पिस्तूलाचा धाक दाखवत तब्बल ६.१५ लाख रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या टोळीतील मुख्य आरोपींचा राजस्थानपर्यंत बाराशे किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी त्यांना अटक केली असून तिसऱ्या स्थानिक आरोपीला तळेगावहून पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गुन्हा केल्यानंतर मोबाईल लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून आरोपींनी मोबाईलऐवजी वॉकी टॉकीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला यश आले आहे. (Pcmc News Update)

दरोड्याची घटना आणि गुन्ह्याची नोंद

निगडी प्राधिकरण येथे १९ जुलै रोजी सायंकाळी एका जेष्ठ नागरिकाच्या बंगल्यात दरोडेखोरांनी घुसखोरी करत वृद्धाचे हातपाय बांधले, तोंडावर चिकटपट्टी लावली. त्यानंतर घरातील कपाटे उचकून ६ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास केला. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ, रोख रक्कम चोरून नेली होती.

pcmc Crime
Ganeshotsav Rules: गणेश मंडळातील प्रसाद वाटपावर FDA ची नजर, बाहेरुन आणलेल्या मिठाईबाबत महत्त्वाचे निर्देश

१२०० किलोमीटर प्रवास ; २०० सीसीटीव्ही तपासले

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. यामध्ये पथकाने सुमारे १२०० किलोमीटर प्रवास केला. तसेच, २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

राजस्थानमधून दोन आरोपी जेरबंद

राजस्थान येथील जयपूरमधून सुरेश लादुराम ढाका (२९, रा. दंतीवास, जि. जलौर, राजस्थान) आणि त्याचा साथीदार यांना शामनगर, जयपूर येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार, चार वॉकी टॉकी, दोन मोबाईल, सोन्याचे दागिने, फिर्यादीचे पाकीट, आधार कार्ड, गाडीचे आरसी बुक असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

pcmc Crime
Senior Citizen Help: 'ज्येष्ठानुबंध' ठरतोय वृद्धांचा आधार; दररोज दोन ते तीन वृद्धांना पोलिसांकडून मदत

तिसरा आरोपी पुण्यातून अटक

गुन्ह्याशी संबंधित असलेला महिपाल रामलाल विष्णोई (१९, सध्या रा. वडगाव मावळ) याला तळेगाव येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून फिर्यादीच्या पत्नीच्या सोन्याच्या बांगड्या, कानातले, घड्याळ आणि बनावट नंबर प्लेट जप्त करण्यात आली.

आरोपींवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

राजस्थान आणि गुजरात राज्यांत या आरोपींवर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आदी २१ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीत एक महिला आरोपी आणि इतर तीन आरोपींचा तपास सुरू असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

वॉकी टॉकीचा ‘शक्कल’

गुन्ह्यानंतर मोबाईल लोकेशन ट्रेस होऊ नये यासाठी आरोपींनी वॉकी टॉकीचा वापर केला. पाच जणांनी स्विफ्ट कारमधून आले. घरात घुसल्यावर एकाने निगराणी ठेवली, एकाने पाळत ठेवली तर उर्वरित आरोपींनी लूट केली. परस्पर संपर्कासाठी त्यांनी मोबाईलऐवजी वॉकी टॉकी वापरले, ही बाब पोलिसांनी तपासात उघड केली. हे उपकरण आणि बनावट नंबर प्लेटसह गाडीही जप्त करण्यात आली आहे.

यांनी केली कामगिरी

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात दत्तात्रय गुळीग, पांडुरंग देवकाते, महेश खांडे, सोमनाथ मोरे, गणेश कोकणे, नितीन लोखंडे, अमर कदम, विनोद वीर आदींचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news