Nigdi Workers Death: निगडीत चेंबरमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू, ऑप्टिकल फायबर टाकण्याचं सुरू होतं काम

Nigdi Todays News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच तिन्ही घरांचे दिवे विझले : बीएसएनएलच्या चेंबरमध्ये घडली घटना
Nigdi Worker Death News
Nigdi Worker Death NewsPudhari
Published on
Updated on

Three workers suffocated to death while laying optical fiber In Nigdi

पिंपरी : स्वातंत्र्यदिनाच्या सकाळी देशभरात तिरंगा फडकवून देशभक्तीची गाणी सुरू असतानाच निगडी प्राधिकरण परिसरात तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला. त्‍यांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरचे काम करताना गुदमरून तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना दुपारी निगडी प्राधिकरण सेक्टर क्रमांक २७, प्लॉट क्रमांक ६५ समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या बीएसएनएलच्या चेंबरमध्ये घडली.

Nigdi Worker Death News
Pimpari Chindchwas News: पिंपरी-चिंचवडचे बिघडले हवामान

दत्ता होलारे, लखन धावरे (दोघेही रा. गुरुद्वारा चौक, आकुर्डी) आणि साहेबराव गिरसेप (रा. बिजलीनगर) अशी मृत कामगारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएल आकुर्डी कार्यालयातील तीन कंत्राटी कामगार नेहमीप्रमाणे रोजच्या कामावर गेले होते. मात्र, चेंबरमध्ये उतरल्यावर हवाबंद जागेत गुदमरल्याने ते बाहेर येऊ शकले नाहीत.

Nigdi Worker Death News
Sangamner News: गटारात काम करताना गुदमरून तरुणाचा मृत्यू; संगमनेरातील घटना

घटनेनंतर परिसरात क्षणात खळबळ उडाली. स्थानिकांनी कामगारांना बाहेर काढण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान, घराबाहेर कामाला गेलेली आपली माणसे आता परत येतील या आशेने वाट पाहणाऱ्या कुटुंबियांना, दुपारपर्यंत त्यांच्या निधनाची दुःखद बातमी कळवण्यात आली. कुणाच्या कपाळावरचे कुंकू पुसले, कुणाच्या डोक्यावरची सावली हिरावली, तर कुणाच्या हातातील कष्टकऱ्याची ऊब कायमची हरपली. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तिन्ही घरांचे दिवे विझल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news