NCMC Card Overcharging: एनसीएमसी कार्डच्या नावाखाली प्रवाशांची लूट; एसटी प्रशासनाची कारवाई, पण पर्यायी केंद्राची माहितीच नाही!

१९९ रुपयांच्या कार्डसाठी ३०० रुपये, ॲक्टिव्हेशनच्या नावाखाली आणखी १०० रुपयांची वसुली; ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना वल्लभनगर आगारापर्यंत पायपीट
Smart Card
Smart CardPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) नोंदणीसाठी प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या एजंटवर एसटी महामंडळ प्रशासनाने कारवाई करत कार्ड जप्त केले. त्यानंतर हे कार्ड कोठे मिळतील, याची माहिती फलक लावलाच नाही. त्यामुळे प्रवाशांना महात्मा फुलेनगर ते वल्लभनगर आगार अशी पायपीट करावी लागत आहे.

Smart Card
Jewellers Gold Seizure Video Recording: सराफांच्या दुकानांतून सोने जप्त करताना पोलिसांना व्हिडीओ चित्रीकरण बंधनकारक

एनसीएमसी कार्ड वितरण करण्यासाठी मे. ईबिक्स टेक्नॉलॉजिस लि. कंपनीमार्फत वल्लभनगर आगारात अधिकृत एजंटची नियुक्ती केली होती. कार्डची किंमत १९९ रुपये असताना सदर एजंट नागरिकांकडून ३०० रुपये उकळत होता.

Smart Card
Bhosari Brother Sister Accident: देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; भोसरीतील सख्ख्या भाऊ-बहिणीचा अपघाती मृत्यू

त्यानंतर पुन्हा एजंटकडून प्रवाशांना महात्मा फुलेनगर परिसरात बोलावून कार्ड ॲक्टिव्हेशनच्या नावाखाली प्रत्येकी १०० रुपये उकळत होता. तक्रारी वाढल्याने वल्लभनगर आगार व्यवस्थापकांनी कारवाई करत एजंटकडील सर्व कार्ड जप्त केले. त्यानंतर पर्यायी व्यवस्थेची माहिती देणारे फलक लावले नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना जुन्या केंद्रावर चकरा मारुन पुन्हा दीड किलोमीटर पायपीट करत वल्लभनगर येथील आगारात यावे लागत आहे.

Smart Card
Pune Grand Tour 2027: पुणे ग्रँड टूर २०२७ साठी पिंपरी-चिंचवडमध्ये ११३ कोटींचा खर्च; रस्ते होणार चकाचक

आगारात प्रमुखांच्या केबिनबाहेर नवीन कार्डसाठी काही एजंटचे मोबाईल क्रमांक प्रसिध्द करण्यात आले आहेत. त्यावर संपर्क साधला असता ते प्रवाशांना आगाराबाहेर बोलावत आहेत. त्यामुळे प्रशासनाने एजंटचे नंबर प्रसिध्द केलेच कसे, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news