Moshi Waste to Energy Accident: मोशी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प दुर्घटना; ९ मृत्यू, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कुटुंबीयांना एक कोटीऐवजी ४० लाखांची भरपाई दिल्याचा आरोप; आमदार रोहित पवारांचा आंदोलनाचा इशारा
Rohit Pawar
Rohit Pawarpudhari photo
Published on
Updated on

पिंपरी: मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील अनधिकृत प्रशासकीय इमारत कोसळून 9 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. त्या घटनेस जबाबदार असलेल्या अ‍ॅन्टोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. कंपनीच्या मालकांसह निलंबित मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्यावर सदोष मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आजही कायम आहे.

Rohit Pawar
Pimpri Chinchwad Police Medal: पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील २९ मानकरी; १३ जणांना ‘अतिउत्कृष्ट’, १६ जणांना ‘उत्कृष्ट’ सेवा पदक

मृतांच्या कुटुंबीयांवर कंपनीने धमकावून एक कोटीऐवजी केवळ 40 लाख रुपयांची भरपाई दिली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Rohit Pawar
Farmer Scientist Forum: देहूत ‘शेतकरी-शास्त्रज्ञ मंच’; बांधावरच शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे

या दुर्घटनेप्रकरणी आमदार पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे 30 जुलैला तक्रार केली होती. त्यासंदर्भात प्रशासनाने काय कारवाई केली. याची माहिती घेण्यासाठी ते शुक्रवारी (दि.14) आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना भेटले. दुर्घटनेसंदर्भातील अहवाल दोन दिवसांत दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे माजी शहराध्यक्ष तुषार कामठे व पदाधिकारी तसेच, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Rohit Pawar
Kasarwadi Dangerous Wall: ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; कासारवाडीतील धोकादायक भिंत जमीनदोस्त

ते म्हणाले की, कंपनीकडून कुटुंबीयांना धमकावून, 1 कोटीची मदत 40 लाख करण्यात आली आहे. ती मागणी आम्ही मान्य करणार नाही. त्या मुद्द्यावर कुटुंबीयांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. कंपनीच्या मालकास सोडून जखमी सुरक्षा सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.

Rohit Pawar
Lonavala Civic Problems: पर्यटननगरी लोणावळ्याला नागरी समस्यांचा विळखा; ‘आम्ही नक्की करायचे काय?’

आंदोलनाचा इशारा

शहरात कचरा समस्या वाढली आहे. मोशी डेपोत घरगुती ओल्या कचर्‍यापासून सीएनजी निर्मितीचा नवीन प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. योगेश आल्हाट यांच्या बोगस शिक्षण प्रमाणपत्राची चौकशी करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. तसेच, त्या दुर्घटनेबाबत महापालिका प्रशासनाकडून अंतर्गत चौकशीही सुरू आहे. आणखी काही दिवस आम्ही वाट पाहणार आहोत. त्यानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आयुक्तांना देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news