Pimpri Chinchwad Police Medal: पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील २९ मानकरी; १३ जणांना ‘अतिउत्कृष्ट’, १६ जणांना ‘उत्कृष्ट’ सेवा पदक

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त सारंग आवाड यांचा समावेश; उपायुक्त श्वेता खेडकर यांना ‘उत्कृष्ट’ पदक
Police
PolicePudhari
Published on
Updated on

पिंपरी: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस दलातील दीर्घकालीन, निष्कलंक आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल दिली जाणारी ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड आणि पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्यासह २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी १३ जणांना ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’, तर १६ जणांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे.

Police
Farmer Scientist Forum: देहूत ‘शेतकरी-शास्त्रज्ञ मंच’; बांधावरच शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे

राज्यातील ७६० पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’, तर १ हजार १८९ जणांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे. अशा प्रकारे राज्य पोलिस दलातील एकूण १ हजार ९४९ अधिकारी आणि अंमलदारांच्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेचा गौरव करण्यात आला आहे.

Police
Kasarwadi Dangerous Wall: ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; कासारवाडीतील धोकादायक भिंत जमीनदोस्त

पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांच्या दीर्घकालीन व निष्कलंक सेवेची दखल घेण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘उत्कृष्ट सेवा पदक’ आणि ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ देण्याची योजना सुरू केली आहे. संबंधित निकषांनुसार पात्र अधिकारी आणि अंमलदारांच्या सेवाकाळातील कामगिरीचे मूल्यमापन करून पदकासाठी निवड केली जाते. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून पोलिस शिपायापर्यंत विविध पदांवरील अधिकारी-अंमलदारांचा यंदाच्या मानकऱ्यांमध्ये समावेश आहे.

Police
Lonavala Civic Problems: पर्यटननगरी लोणावळ्याला नागरी समस्यांचा विळखा; ‘आम्ही नक्की करायचे काय?’

‘अतिउत्कृष्ट’चे १३ मानकरी

‘अतिउत्कृष्ट सेवा पदका’साठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे, तत्कालीन पोलिस निरीक्षक नितीन गिते, अनिल विभूते, पोलिस निरीक्षक अरविंद पवार, गोरखनाथ कुंभार, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, सहायक फौजदार नागेश माळी, राजेंद्र शिंदे, सुनील कानगुडे, राजू जाधव आणि हवालदार रामदास बारटक्के यांची निवड झाली आहे.

उपायुक्त खेडकरांसह १६ जणांना ‘उत्कृष्ट’

‘उत्कृष्ट सेवा पदका’साठी पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, पोलिस निरीक्षक विनोद पाटील, सुहास आव्हाड, रविकिरण नाळे, सचिन शिर्के, सहायक पोलिस निरीक्षक सचिन घाटे, सहायक फौजदार दीपक महाजन, आदिनाथ मिसाळ, राजेंद्र कोणकेरी, हवालदार विवेक जगदाळे, अनिल साळुंके, अमोल निघोट, संतोष शिंदे, आशिष बोटके, महिला पोलिस हवालदार कामिनी पवळे आणि महिला पोलिस शिपाई नूतन जव्हेरी यांचा समावेश आहे. मानकऱ्यांमध्ये गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा, परवाना शाखा, मुख्यालय तसेच विविध पोलिस ठाण्यांतील अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आदेशानुसार पदक जाहीर झालेल्या अधिकारी आणि अंमलदारांचा आज शनिवारी (दि. १५) सकाळी साडेआठ वाजता पोलिस आयुक्तालयातील शिवनेरी हॉलमध्ये सन्मान केला जाणार आहे.

Police
Dr. D Y Patil Condolence Meeting: ज्ञानसूर्य पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या आठवणींना उजाळा

कधी दिले जातात 'पदक'?

‘उत्कृष्ट सेवा पदका’साठी किमान १५ वर्षांची, तर ‘अतिउत्कृष्ट सेवा पदका’साठी किमान २५ वर्षांची सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे. मात्र, केवळ सेवाकाल पूर्ण झाला म्हणजे पदक मिळते असे नाही. सेवेत निष्ठा, कौशल्य आणि उल्लेखनीय कामगिरीलाही महत्त्व दिले जाते. याशिवाय ‘स्मार्ट पोलिसिंग पॅरामीटर्स’नुसार कामगिरीचे गुणांकन केले जाते. एकत्रित गुणांकनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे अधिकारी-कर्मचारी पदकासाठी पात्र ठरतात. पदकासाठी पाठविण्यात येणाऱ्या अहवालात संबंधित अधिकारी किंवा अंमलदाराने संपूर्ण सेवाकाळात केलेल्या उत्कृष्ट आणि विशेष कामगिरीचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. त्यामुळे या पदकासाठी सेवाज्येष्ठतेबरोबरच निष्कलंक आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीही महत्त्वाची असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news