Moshi Accident: मोशी दुर्घटनेला २४ तास उलटले; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सनी माने यांचा अद्याप शोध नाही, पत्नीचा हृदयद्रावक आक्रोश

'पप्पा कधी येणार?' दोन चिमुकल्यांचा सवाल; बचावपथकाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू
Moshi Accident
Moshi AccidentPudhari
Published on
Updated on

मोशी: "सगळं जग समोर दिसतंय, पण माझे कुंकू कुठे हरवलंय? कालपासून माझे डोळे त्यांनाच शोधतायत... कुठे आहेत ते?" दोन चिमुरड्यांना काळजाशी घट्ट कवटाळून एका हताश माऊलीने फोडलेला हा टाहो तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला. मोशी येथील भीषण दुर्घटनेला २४ तास उलटून गेले तरी, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सनी माने या या कामगाराचा अजूनही कोणताही शोध लागलेला नाही. प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू असली, तरी काळ जसा पुढे सरकतोय, तशी माने कुटुंबाची धडधड आणि काळजाचा थरकाप वाढत चालला आहे.

Moshi Accident
Pimpri Chinchwad Sant Tukaram Maharaj Palkhi: ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात पिंपरी-चिंचवड भक्तिरंगात न्हाले; संत तुकाराम महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत

मोशीतील शास्त्रीनगर येथे राहणारे सनी माने गेल्या तीन वर्षांपासून कायमस्वरूपी वाहन चालक (ड्रायव्हर) म्हणून प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. कष्ट करून आपल्या कुटुंबाला सुखात ठेवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांच्या पत्नी आणि दोन मुले असा अत्यंत सुखी परिवार आहे. मोठा मुलगा ईशान्य (७ वर्षे) हा गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत असून, लहान मुलगा विहान हा अवघ्या दोन वर्षांचा आहे. परवापर्यंत हसतं-खेळतं असणारं हे कुटुंब आज एकाएकी काळाच्या क्रूर खेळामुळे अंधारात ढकललं गेलं आहे.

Moshi Accident
Teachers Government Duties Impact Education: शिक्षक शासकीय कामांत व्यस्त; वर्गखोल्या रिकाम्या, विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम

घटनेला २४ तासांपेक्षा जास्त वेळ उलटून गेला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर काही कामगारांची सुटका करण्यात यश आले असले, तरी सनी माने यांचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. पती सुखरूप परत येईल या आशेने त्यांच्या पत्नीची तहान-भूक हरपली आहे. डोळ्यांतील अश्रू सुकले आहेत, पण आशा जिवंत आहे. दरम्यान, दोन वर्षांचा लहानगा विहान "पप्पा कधी येणार?" असा निष्पाप प्रश्न विचारत आहे. त्या चिमुरड्याला काय उत्तर द्यावे, या विचाराने संपूर्ण परिसर हेलावून गेला आहे.

Moshi Accident
Lonavala Flood Situation: लोणावळ्यात पुराचा तडाखा; ५०३ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, २५० हून अधिक घरांचे नुकसान

"प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू, पण..."

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि बचावकार्यासाठी यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे. ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सनी माने यांच्यासह इतर अडकलेल्यांचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. "लवकरच त्यांचा शोध लागेल," असे आश्वासन प्रशासनाकडून वारंवार दिले जात आहे, परंतु वेळ जसजशी निघून जात आहे, तशी नातेवाईकांची चिंता वाढत आहे.

Moshi Accident
Pimpri Chinchwad Sant Tukaram Maharaj Palkhi: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अभंगरंग’चा भक्तिसोहळा; संत तुकाराम महाराजांच्या पालखीवर दै. ‘पुढारी’तर्फे स्वराभिषेक

परिसरात हळहळ; सुखरूपतेसाठी प्रार्थना

या दुर्घटनेमुळे मोशी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सनी माने हे स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ आणि कष्टाळू असल्याने, ते सुखरूप बाहेर यावेत यासाठी संपूर्ण परिसरातील नागरिक देवाकडे प्रार्थना करत आहेत. त्या दोन लेकरांच्या माऊलीचा टाहो थांबवण्यासाठी आणि माने कुटुंबाला हा कठीण प्रसंग सोसण्याची ताकद मिळावी, हीच आता प्रत्येकाची भावना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news