

वडगाव मावळ: मावळ तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडीत भाजपने राष्ट्रवादीला युतीचा प्रस्ताव देत दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नाराज इच्छुकाला हेरून थेट इंदोरी वराळे गटाचा पॅनल जाहीर करून एकप्रकारे भाजपने राष्ट्रवादीला मधप्पाफ दिल्याचा प्रकार घडला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार यादी जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग््रेासच्यावतीने आज सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्यासह ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, रामनाथ वारिंगे, काळूराम मालपोटे, दीपक हुलावळे, भरत येवले, महादूबुवा कालेकर, ग््राामीण अध्यक्ष संदीप आंद्रे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, महिलाध्यक्षा सुवर्णा राऊत आदी उपस्थित झाले.
या वेळी राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर होणार हे अपेक्षित असताना आमदार शेळके व तालुकाध्यक्ष खांडगे यांनी आमच्याकडे भाजपचे कोअर कमिटी अध्यक्ष निवृत्ती शेटे, अण्णासाहेब दाभाडे यांनी युतीच्यादृष्टीने काही प्रस्ताव दिला असल्याने तूर्त आम्ही उमेदवार यादी स्थगित करत असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, याच कालावधीत पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी इंदोरी वराळे गटातील राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार मेघा भागवत व प्रशांत भागवत यांनी पक्षाकडून उमेदवारी मिळत नसल्याने आमच्यावर अन्याय होत असल्याचे कारण देऊन पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले.
भाजपने संपूर्ण पॅनेलच केला जाहीर
पत्रकार परिषद संपल्यानंतर काही वेळातच मेघा भागवत व प्रशांत भागवत यांचा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे आदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. इतकेच नाही तर राष्ट्रवादीकडे भाजपचा प्रस्ताव देणारे निवृत्ती शेटे यांचा मुलगा रवी शेटे यांना वराळे गण व अण्णासाहेब दाभाडे यांचा मुलगा श्रीकृष्ण भेगडे यांना इंदोरी गणाची उमेदवारी तसेच भाजपात प्रवेश केलेल्या मेघा भागवत यांना इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटाची उमेदवारी जाहीर करत या गटातील संपूर्ण पॅनेलच भाजपने जाहीर करून टाकला. एकंदर, राष्ट्रवादीला युतीचा प्रस्ताव देऊन भुलवत ठेवत भाजपने राष्ट्रवादीच्या नाराज झालेल्या मातब्बर उमेदवाराला हेरून इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटाचा अधिकृत उमेदवार जाहीर करून एकप्रकारे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच धप्पा दिला असल्याचे दिसते.
भागवत यांनी आमचा विश्वासघात केला : गणेश खांडगे
राष्ट्रवादी काँग््रेासचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले, की इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटातील उमेदवारीबाबत आरक्षण सोडत जाहीर झाल्यापासून चर्चा सुरू होती. गेल्या काही दिवसांत भागवत यांना कार्यकर्ता म्हणून न्याय द्यावा या उद्देशाने इंदोरी गणाची सर्वसाधारण जागेची उमेदवारी देण्याचा निर्णयही झाला. यासोबत उपसभापती पद, जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य देण्यासह त्यांच्याकडून मांडण्यात आलेल्या विविध मागण्या मान्यही केल्या होत्या. युतीचा प्रस्ताव घेऊन भाजप नेत्यांना घेऊन तेच आले होते, दुपारी याबाबत बोलणेही झाले होते, परंतु हा सगळा दिखावा होता, ते आमच्यासोबत राहून भाजपच्या संपर्कात राहिले आणि आमचा विश्वासघात केला असा आरोप केला.