Maval Scholarship Exam Result: ‘पुढारी’च्या वृत्तानंतर मावळ शिक्षण विभागाची धावपळ; जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष नियोजन

शिष्यवृत्ती निकालातील ढासळलेली कामगिरी सुधारण्यासाठी गुणवत्ता विकास समिती स्थापन; दर आठवड्याला सराव परीक्षा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन
Scholarship Exam Result
Scholarship Exam ResultPudhari
Published on
Updated on

वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून दैनिक पुढारीने मावळ तालुक्यातील ढासळलेली शैक्षणिक गुणवत्ता निदर्शनास आणून देत याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी तातडीने शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध काम करण्याचा निर्णय घेतला.

Scholarship Exam Result
PMRDA Firefighters Salary Issue: नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या पीएमआरडीए अग्निशमन जवानांचीच उपेक्षा; वेतन-भत्ते रखडल्याची तक्रार

शिष्यवृत्ती परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार, मावळ तालुक्यात ६७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून, यामध्ये जिल्हा परिषद शाळांतील फक्त ९ विद्यार्थी आहेत. तसेच नापास झालेल्या ३८११ विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद शाळांतील १६४९ विद्यार्थी आहेत. यावरून जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळली असल्याचे स्पष्ट होत आहे.

Scholarship Exam Result
PCMC Malnutrition Children: स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडमध्ये २५५६ बालके कुपोषित; अंगणवाडी सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

याबाबत दैनिक पुढारीने १४ जुलै रोजी 'बापरे! मावळातील ५०८३ पैकी ३८११ विद्यार्थी नापास' तर १६ जुलै रोजी 'साहेब.. जरा शिक्षण खात्याकडेही लक्ष द्या' हे वृत्त प्रसिद्ध करून मावळ तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेची स्थिती मावळ पंचायत समिती शिक्षण विभाग व पदाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.

Scholarship Exam Result
Moshi Waste To Energy Accident: चौकशी समितीची धडक पाहणी; ३५ मुद्द्यांची माहिती मागवल्याने महापालिका प्रशासनाची धावपळ

दरम्यान, यासंदर्भात आज सभापती सुनीता येवले, उपसभापती साहेबराव कारके, गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे यांनी तातडीने चर्चा करून आगामी काळात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या उद्देशाने नियोजनबद्ध काम करण्याचा निर्णय घेतला असून, त्यादृष्टीने गटशिक्षणाधिकारी रोडगे यांनी आजच विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची बैठक घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली.

गुणवत्ता विकास समितीची स्थापना

शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता शिष्यवृत्ती इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती गुणवत्ता विकास कार्यक्रम आखणी केली असून, यासाठी गुणवत्ता विकासाची समिती स्थापन करून दर महिन्याला एक कार्यशाळा तसेच विद्यार्थ्यांकरिता दर आठवड्याला एक सराव परीक्षा असे नियोजन ऑगस्ट महिन्यापासून केलेले आहे. तसेच तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळवून देण्यात येईल.

Scholarship Exam Result
PCMC E Office System Down: पिंपरी-चिंचवड महापालिकेची ई-ऑफिस प्रणाली ठप्प; ११२ कोटींच्या सॉफ्टवेअरवर प्रश्नचिन्ह

शिष्यवृत्तीच्या विविध प्रकाशनाची पुस्तके वापरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल व येत्या शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ तालुक्याचे गुणवत्तेचे प्रमाण नक्कीच वाढल्याचे दिसेल.

शिल्पा रोडगे, गटशिक्षणाधिकारी, मावळ पंचायत समिती.

दैनिक पुढारीने शिष्यवृत्ती परीक्षा निकालाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील प्रामुख्याने जिल्हापरिषद शाळांतील गुणवत्तेची स्थिती निदर्शनास आणून दिली आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता आगामी काळात विशेषतः पंचायत समिती शिक्षण विभागाकडे आम्ही विशेष लक्ष केंद्रित करून शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करणार आहोत.

साहेबराव कारके, उपसभापती, मावळ पंचायत समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news