Maval NCP Candidate: मावळमध्ये राष्ट्रवादीचे पुढचे आमदार आणि खासदार कोण?

आमदार शेळके पुढच्या निवडणुकीत आमदार राहणार; खासदारकीचा उमेदवार कोण?
Candidate
CandidatePudhari
Published on
Updated on

गणेश विनोदे

वडगाव मावळ: तीन वर्षांनंतर येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्यादृष्टीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी काम करावे, अशी सूचना करत असताना आमदार सुनील शेळके यांनी पुढचा आमदार आणि खासदारही राष्ट्रवादीचाच असेल; पण मी मावळ तालुका सोडून जाणार नाही, असेही स्पष्ट केले. त्यामुळे पुढचा खासदार राष्ट्रवादीचा असेल, मग तो नेमका कोण असेल, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Candidate
Paud Road Court: पौड रोड न्यायालयामुळे हिंजवडी-वाकड भागातील नागरिकांना मोठा त्रास

मावळ पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती, उपसभापती निवडीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शेळके हे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करावे, याबाबत मार्गदर्शन करत होते. त्या वेळी बोलताना आता पुढची साडेतीन वर्षे ग््राामपंचायत वगळता कोणत्याही मोठ्या निवडणुका नाहीत. आता थेट सन 2029 ला लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार असून, या दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची दाट शक्यता आहे. त्या वेळी पुढचा आमदार तर राष्ट्रवादीचाच असणार; पण खासदारही राष्ट्रवादीचाच असणार, असा दावा करत, मी इथेच असणार, मी कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट करून ते पुन्हा आमदारच होणार असल्याचे संकेत दिले.

Candidate
Pimpri Chinchwad Hotels LPG Shortage: एलपीजी टंचाईचा पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल व्यवसायावर फटका

यापूर्वीही आमदार शेळके यांनी पुढच्या वेळी राष्ट्रवादीचा आमदार सुमारे दीड लाखाच्या फरकाने विजयी झालेला असेल, असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच, आमदार शेळके हे विधानसभेची हॅटट्रिक मारून मावळ तालुक्यात नवा इतिहास घडवणार अशाही वल्गना प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांकडून आणि नेत्याकडून केल्या जातात. त्यामुळे भविष्यातील विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शेळकेच असणार हे जवळपास निश्चित आहे, मग खासदारकीचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता आहे.

Candidate
Pimpri Chinchwad Climate Budget: पिंपरी-चिंचवडच्या अर्थसंकल्पातून क्लायमेट बजेट गायब

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

दरम्यान, खासदारही राष्ट्रवादीचाच असणार असा दावा करताना फक्त तो मी नसेल असेही आमदार शेळके यांनी स्पष्ट केल्याने भविष्यातील राष्ट्रवादीचा खासदार कोण असेल ? लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार का ? आमदार शेळकेंच्या नजरेसमोर खासदारकीचा नेमका उमेदवार कोण असेल, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Candidate
Pimpri Businessman Kidnapping: ‘यूपी पोलिस’ बनून व्यापाऱ्याचे अपहरण; ५० लाखांची खंडणी

खासदार श्रीरंग बारणेंनाही आव्हान!

दरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीविषयी भाष्य करताना आमदार शेळके यांनी पुढचा आमदार आणि खासदार दोन्हीही राष्ट्रवादीचे असणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत महायुती असणार की नाही ? हा पहिला प्रश्न उपस्थित होत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात खासदारकीची हॅटट्रिक मारणारे खासदार श्रीरंग बारणे यांच्यापुढे राष्ट्रवादी आव्हान उभे करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news