Maval Market Committee Election Result: मावळ बाजार समितीत भाजपचा झेंडा; राष्ट्रवादीला धक्का

सभापतीपदी सुभाषराव जाधवांचा अनपेक्षित विजय; चार मतांनी बाजी मारली
Maval Market Committee Election Result
Maval Market Committee Election ResultPudhari
Published on
Updated on

वडगाव मावळ: मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे सुभाषराव जाधव यांनी चार मतांनी अनपेक्षित विजय मिळवत राष्ट्रवादीला धक्का दिला. तर, उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे विलास मानकर यांची बिनविरोध निवड झाली.

Maval Market Committee Election Result
Pimpri Pollution Hariyal Bird Death: पिंपरीत राज्यपक्षी हरियाल मृतावस्थेत; उष्णता व प्रदूषणाचा घात

बाजार समितीचे मावळते सभापती संभाजी शिंदे व उपसभापती नामदेव शेलार यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सभापती उपसभापती पदासाठी सहायक निबंधक सर्जेराव कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ येथील सहायक निबंधक कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या वेळी सभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे विक्रम कलवडे तर भाजपचे सुभाषराव जाधव यांनी अर्ज दाखल केले होते. उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीचे विलास मानकर व भाजपचे सोमनाथ मांडेकर यांनी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, मांडेकर यांनी अर्ज मागे घेतल्याने विलास मानकर यांची उपसभापती पदावर बिनविरोध निवड झाली. तर, सभापती पदासाठी गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये भाजपचे सुभाषराव जाधव यांना 11 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे विक्रम कलावडे यांना 7 मते मिळाली. त्यामुळे चार मतांनी जाधव यांनी विजय मिळवल्याने त्यांची सभापतीपदी निवड झाली.

Maval Market Committee Election Result
Pimpri Property Tax Collection: पिंपरी-चिंचवडमध्ये 860 कोटींची मालमत्ताकर वसुली; अभय योजनेची मुदत अखेरच्या टप्प्यात

कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे केवळ पाच सदस्य

वास्तविक बाजार समितीमध्ये सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे 12, काँग्रेसचे एक व भाजपचे पाच असे संख्याबळ आहे. यापूर्वी सभापती व उपसभापती दोन्ही पदे राष्ट्रवादीकडे होती. दरम्यान, आगामी काळात सर्वांना पदाची संधी मिळावी, यादृष्टीने चिठ्ठीद्वारे निवडप्रक्रिया करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने घेतला होता; परंतु आज निवडणुकीपूर्वी फक्त राष्ट्रवादीच्या संचालकांची बैठक झाली आणि त्यामध्ये चिठ्ठीद्वारे उमेदवार घोषित करण्यात आले. यामध्ये विक्रम कलवडे व विलास मानकर यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याची सूचना पक्षाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, निर्णय झालेला असताना विश्वासात न घेतल्याने भाजपच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केल्याने निवडणुकीला सामोरे जावे लागले.

Maval Market Committee Election Result
Pimpri Medical Negligence Complaint Rules: डॉक्टरांविरुद्ध थेट गुन्हे नोंदवू नका; पिंपरी पोलिसांचे नवे निर्देश

या दरम्यान झालेल्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी व काँग्रेसचे मिळून 13 संचालक व भाजपचे अवघे 5 संचालक असताना राष्ट्रवादीचे उमेदवार कलवडे यांना अवघी 7 मते मिळाली. तर, भाजपचे उमेदवार जाधव यांना 11 मते मिळाली आणि एकहाती वर्चस्व असलेल्या बाजार समितीवर भाजपने अनपेक्षित झेंडा फडकवला. मतदान प्रक्रियेत बाजार समितीचे संचालक संभाजी शिंदे, नामदेव शेलार, मारुती वाळुंज, दिलीप ढोरे, विलास मालपोटे, बंडू घोजगे, साईनाथ मांडेकर, सुप्रिया मालपोटे, अंजली जांभूळकर, शिवाजी असवले, नथुराम वाघमारे, अमोल मोकाशी, साहेबराव टकले, नामदेव कोंडे, शंकर वाजे यांनी सहभाग घेतला.

Maval Market Committee Election Result
Pimpri Women Bike Rally: पिंपरीत रामनवमीनिमित्त महिला भव्य बाईक रॅली; नारीशक्तीचा जल्लोष

20-20 हजारांसाठी राष्ट्रवादीचे संचालक फुटले?

बाजार समितीमध्ये 18 पैकी 13 संचालक राष्ट्रवादीचे असताना राष्ट्रवादीच्या उमेदवारास अवघी सात मते मिळाली. त्यामुळे सहा जणांनी भाजपचे उमेदवार जाधव यांना मतदान केल्याचे उघड झाले. संबंधित फुटलेल्या उमेदवारांनी 20-20 हजार रुपये घेऊन पक्षनिष्ठा बाजूला ठेवल्याचा आरोप पराभूत उमेदवार विक्रम कलवडे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे संचालक 20-20 हजारांसाठी फुटल्याची चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news