Lonavala Smart City Development: लोणावळा ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने; जागतिक दर्जाच्या विकासाला गती

रस्ते, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि पर्यटनासाठी मोठा आराखडा; प्रशासन-लोकप्रतिनिधी एकत्र
Smart City
Smart CityPudhari
Published on
Updated on

लोणावळा: पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहराला आता जागतिक दर्जाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. ‌‘स्मार्ट सिटी‌’च्या धर्तीवर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार सुनील शेळके यांच्या विशेष पुढाकारातून झालेल्या या बैठकीत शहराच्या आधुनिक विकासाचा आणि प्रलंबित प्रश्नांच्या निवारणाचा सविस्तर आराखडा मांडण्यात आला.

Smart City
Wakad Encroachment Action: वाकड-म्हातोबानगर येथे 41 झोपड्यांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला मार्ग

मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांच्या केंद्रस्थानी असलेल्या लोणावळ्याचे निसर्गसौंदर्य जागतिक पर्यटकांना आकर्षित करते. हेच लक्षात घेऊन शहराला पाश्चिमात्य देशांतील पर्यटन स्थळांप्रमाणे विकसित करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे. या बैठकीत प्रामुख्याने खालील मुद्द्‌‍यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

Smart City
Pimpri Chinchwad Census: पिंपरी-चिंचवड जनगणना 2026 साठी सज्ज; प्रगणकांना विशेष प्रशिक्षण

लोणावळ्याच्या विकासासाठी आमदार सुनील शेळके यांनी घेतलेला पुढाकार या बैठकीत केंद्रस्थानी राहिला. शहरात नवे प्रकल्प आणणे, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि उद्योगांना चालना देणे, ही त्यांची दूरदृष्टी या आराखड्यातून दिसून येत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयामुळे लोणावळ्याचा विकास आता खऱ्या अर्थाने गती घेणार आहे.

Smart City
PMRDA Housing Lottery: पीएमआरडीएची 1,029 घरांची सोडत आज; 5,317 जणांचे नशीब आजमावणार

या बैठकीला लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पक्षभेद विसरून या विकास आराखड्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी कटिबद्धता दर्शवत जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले. या विकास आराखड्यामुळे आगामी काळात लोणावळा शहर अधिक देखणे, सुरक्षित आणि सुसज्ज होणार असून, पर्यटकांसह स्थानिकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.

Smart City
Pimpri Chinchwad Passport Verification: पिंपरी-चिंचवडमध्ये 520 पासपोर्ट अर्ज बाद; गुन्हेगारांचे परदेश स्वप्न फोल
  • रस्ते व पायाभूत सुविधा : प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण, पदपथ सुधारणा आणि जंक्शनमध्ये आधुनिक बदल करणे.

  • शिस्तबद्ध शहर : अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवणे, हॉकर्स झोनची निर्मिती आणि सुनियोजित पार्किंग झोन तयार करणे.

  • आधुनिक यंत्रणा : भूमिगत विद्युतवाहिन्या, नवीन पथदिवे आणि पिण्याच्या पाण्याचे सक्षम नियोजन.

  • स्वच्छता : कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.

लोणावळ्याचा विकास हा केवळ रस्ते बांधणीपुरता मर्यादित नसून, शहराला जागतिक स्तरावरील एक सुरक्षित आणि सुंदर पर्यटन केंद्र बनवणे हे आमचे ध्येय आहे.

सुनील शेळके, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news