Pimpri Chinchwad Census: पिंपरी-चिंचवड जनगणना 2026 साठी सज्ज; प्रगणकांना विशेष प्रशिक्षण

16 मेपासून घरगुती सर्वेक्षण; डिजिटल पद्धतीने अचूक डेटा संकलनावर भर
Census
CensusPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शहरात व्यापक तयारी सुरू झाली आहे. अचूक, पारदर्शक आणि प्रभावी जनगणना पार पाडण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे.

Census
PMRDA Housing Lottery: पीएमआरडीएची 1,029 घरांची सोडत आज; 5,317 जणांचे नशीब आजमावणार

सहा दिवसाच्या प्रशिक्षणात क्षेत्रीय प्रशिक्षक (फिल्ड ट्रेनर्स) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध केंद्रांवर सत्रे सुरू आहे. सत्रांमध्ये जनगणना प्रक्रियेची सखोल माहिती, घरगुती सर्वेक्षण पद्धती, डिजिटल साधनांचा वापर, डेटा संकलनातील अचूकता आणि नागरिकांशी प्रभावी संवाद यावर विशेष भर दिला जात आहे.

Census
Pimpri Chinchwad Passport Verification: पिंपरी-चिंचवडमध्ये 520 पासपोर्ट अर्ज बाद; गुन्हेगारांचे परदेश स्वप्न फोल

जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा 16 मे 2026 ते 14 जून 2026 दरम्यान राबवण्यात येणार आहे. या टप्प्यात घरगुती सर्वेक्षण केले जाईल. प्रत्येक कुटुंबाची अचूक माहिती संकलित करून पुढील नियोजनासाठी डेटा तयार करण्याचा उद्देश यामागे आहे. त्यानंतरच्या टप्प्यात प्रत्यक्ष जनगणनेचे काम हाती घेतले जाणार आहे, ज्यामुळे शहराच्या लोकसंख्येचा तसेच सामाजिक व आर्थिक स्थितीचा व्यापक आढावा मिळणार आहे.

Census
Fake Notes: बनावट नोटांचे बंडल देऊन कार पळवली; टोळीच्या चाकण पोलिसांनी आवळल्या मुसक्या

उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार म्हणाले की, जनगणना ही केवळ आकडेवारी नसून, शहराच्या विकासाचा पाया आहे. अचूक माहितीच्या आधारेच भविष्यातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि इतर नागरी सेवांचे नियोजन करता येते. त्यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून माहिती संकलन सुलभ आणि जलद करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, माहितीची गोपनीयता आणि अचूकता राखण्यासाठी विशेष मार्गदर्शनही दिले जाणार आहे.

Census
Pimpri News: रिल्सच्या नादात वाढतेय गुंडगिरी मानसिकता

महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, महापालिकेच्या या पुढाकारामुळे पिंपरी चिंचवड शहर जनगणना प्रक्रियेसाठी पूर्णपणे सज्ज होत आहे. नागरिकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रत्यक्ष घर भेटीसाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना सर्वतोपरी सहकार्य करून, अचूक व योग्य माहिती देणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news