Wakad Encroachment Action: वाकड-म्हातोबानगर येथे 41 झोपड्यांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला मार्ग

पीसीएमसीची संयुक्त मोहीम; डीपी रस्त्यासाठी अतिक्रमण हटवले
Wakad Encroachment Action
Wakad Encroachment ActionPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या वाकड-म्हातोबानगर येथील 24 मीटर डिपी रस्त्यावरील 1500 चौरस मीटर जागेवरील 41 अनधिकृत झोपड्या तसेच, बांधकामांवर कारवाई करण्यात आली. रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.

Wakad Encroachment Action
Pimpri Chinchwad Census: पिंपरी-चिंचवड जनगणना 2026 साठी सज्ज; प्रगणकांना विशेष प्रशिक्षण

क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, कार्यकारी अभियंता आर. व्ही. शिंदे, दळणवळण विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. महापालिका स्थापत्य, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, प्रशासन व स्थापत्य, शहरी दळणवळण विभाग, नगररचना विभाग, विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग, अग्निशामक व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

Wakad Encroachment Action
PMRDA Housing Lottery: पीएमआरडीएची 1,029 घरांची सोडत आज; 5,317 जणांचे नशीब आजमावणार

महापालिकेच्या विकास आराखड्यात विविध सार्वजनिक सुविधा, रस्ते व पायाभूत प्रकल्पांसाठी जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. शहराचा नियोजित आणि सुटसुटीत विकास साधण्यासाठी या आरक्षित जागा अतिक्रमणमुक्त ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी विकास आराखड्यातील आरक्षित जागांवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण करू नये.

Wakad Encroachment Action
Pimpri Chinchwad Passport Verification: पिंपरी-चिंचवडमध्ये 520 पासपोर्ट अर्ज बाद; गुन्हेगारांचे परदेश स्वप्न फोल

तसेच, आरक्षित जागांवरील अतिक्रमणांमुळे भविष्यात विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि अशा अतिक्रमणांवर नियमानुसार निष्कासनाची कारवाई केली जाईल, याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. नियोजनबद्ध शहर विकासासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Wakad Encroachment Action
Fake Notes: बनावट नोटांचे बंडल देऊन कार पळवली; टोळीच्या चाकण पोलिसांनी आवळल्या मुसक्या

शहरातील प्रमुख रस्ते व सार्वजनिक सुविधा सक्षम, सुरक्षित आणि दीर्घकालीन दृष्टीने सक्षम करण्यासाठी अतिक्रमण हटविणे अत्यावश्यक आहे. शहराची वाढती लोकसंख्या, वाहतुकीचा ताण आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता रस्ते रुंदीकरण ही केवळ प्रशासकीय कारवाई नसून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनमान उंचावण्याशी थेट संबंधित बाब आहे. रस्ता रुंदीकरण कारवाईस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करतो.

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news