Lonavala Ganesh Visarjan: लोणावळ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस सज्ज

डीजे, लेझर, प्लाझ्मावर बंदी; ६ अधिकारी आणि ८५ पोलिसांचा तगडा बंदोबस्त, मंडळांना चौकनिहाय वेळापत्रक
Ganeshotsav Police Action
Ganeshotsav Police ActionPudhari
Published on
Updated on

लोणावळा: शहरातील गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक देदीप्यमान आणि कायदा व सुव्यवस्था राखणारी व्हावी, याकरिता लोणावळा शहर पोलिस सज्ज झाले आहेत. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त नियुक्त करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणूक वेळेत व्हावी, यासाठी मंडळांना प्रत्येक चौकात येण्याचे वेळापत्रक देखील देण्यात आले आहे. प्रत्येक मंडळाने या वेळेचे पालन करावे व शिस्तबद्ध पद्धतीने पारंपरिक वाद्यामध्ये मिरवणूक काढावी, असे आवाहन लोणावळा शहर पोलिसांनी केले आहे.

Ganeshotsav Police Action
Pavana River Pollution: पवना नदीत रासायनिक सांडपाणी; चार कंपन्यांना २.५८ कोटींचा दंड

यंदाच्या मिरवणुकीत डीजे, लेझर, प्लाझ्मा यांना बंदी असणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गवळीवाडा या मंडळाची वैयक्तिक बैठक घेत त्यांना यंदा गुलाल न उधळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोणावळा शहरात गणेशोत्सवाची शंभर वर्षांची मोठी परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत समन्वयातून विसर्जन मिरवणूक पार पडावी, याकरिता पोलिस प्रशासनाकडून सर्व मंडळांच्या तीनवेळा समन्वय बैठका घेण्यात आल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी लोणावळा शहरात रूट मार्च करण्यात आला. एखादी चुकीची घटना घडल्यास ती हाताळण्यासाठी मॉकड्रिल घेण्यात आले तसेच राउंड फायर देखील करण्यात आले आहे.

Ganeshotsav Police Action
Pimpri Chinchwad Municipal Corporation: निवडणूक आचारसंहितेचा महापालिका कामकाजाला ब्रेक

25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी लोणावळ्यात मानाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. यामध्ये 21 गणेशोत्सव मंडळे पारंपरिक पद्धतीने नंबरप्रमाणे रांगेत येणार आहेत. मानाच्या पहिल्या गणपतीचे यंदाचे शंभरावे वर्ष आहे. त्यांना सायंकाळी 4.30 वाजता मावळा पुतळा चौकात येण्याची वेळ ठरवून देण्यात आली आहे. यंदा बंदोबस्त मिरवणुकीसाठी 6 पोलिस अधिकारी व तब्बल 85 पोलिस कर्मचारी, असा मोठा बंदोबस्त असणार आहे.

Ganeshotsav Police Action
Wakad Crime: छेड काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; चौघांना अटक

प्रत्येक मंडळासोबत पोलिस तैनात

प्रत्येक मंडळासोबत पोलिस तैनात असणार आहेत. मिरवणुकीदरम्यान दोन मंडळांमध्ये अंतर राहणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. जयचंद चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अनेक स्वागत कक्ष असले तरी त्या ठिकाणी प्रत्येक एक मध्यवर्ती ठिकाणी ढोल-ताशा पथकाने खेळ घेण्यात यावेत, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. राजकीय पक्षांनी वेगवेगळे स्वागत कक्ष न उभारता एकच मोठा स्वागत कक्ष तयार करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.

विसर्जन घाटावर लाइटव्यवस्था

विसर्जन मिरवणुकीत ट्रॉली व डेकोरेशनला अडथळा होऊ नये, याकरिता विसर्जन मार्गावरील सर्व स्वागत कमानी काढून घेण्याबाबत मंडळांना सांगण्यात आले आहे. सर्व मंडळांनी आणि भक्तांनी विसर्जन मिरवणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने विसर्जन घाटावर लाइटव्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहेत. नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी मिरवणुकीदरम्यान उपस्थित असणार आहेत.

Ganeshotsav Police Action
Indrayani River Rejuvenation Project: इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाच्या जागेवरून महापालिकेचा पेच; ५७ हेक्टरपैकी केवळ १७ हेक्टर ताब्यात

गवळीवाडा मंडळाला गुलाल न उधळण्याचे आवाहन

लोणावळा शहरात सर्वाधिक गुलालाची उधळण करणारे मंडळ अशी ओळख असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गवळीवाडा, मानाचा चौथा गणपती यांची लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी बैठक घेत त्यांना यंदा गुलाल न उधळण्याचे आवाहन करीत सर्व मंडळांसमोर एक आदर्श ठेवावा, असे आवाहन केले आहे. तसेच, इतर गणेश मंडळांना वेळेचे भान ठेवत ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे चौकात या, असे आवाहन केले आहे.

यंदाच्या विसर्जन मिरवणुकीतील प्रमुख नियम व नियोजन

  • डीजे, लेझर, प्लाझ्माच्या वापरावर बंदी

  • गणेशोत्सव मंडळांना गुलाल न उधळण्याचे आवाहन

  • प्रत्येक मंडळाला चौकनिहाय निश्चित वेळापत्रक

  • मिरवणूक वेळेत पूर्ण करण्यासाठी ६ अधिकारी व ८५ पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

  • प्रत्येक मंडळासोबत पोलिस कर्मचारी तैनात

  • अनुचित घटना टाळण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती

  • मिरवणूक मार्गावरील स्वागत कमानी हटविण्याच्या सूचना

  • स्वागत कक्षांची संख्या व मांडणी नियंत्रित करण्याचे आवाहन

  • नगरपरिषदेकडून विसर्जन घाटावर प्रकाशव्यवस्था आणि अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news