

लोणावळा: लोणावळा शहरामध्ये मागील काही दिवसांपासून वातावरणामध्ये मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. पहाटे व मध्यरात्री लोणावळा परिसरामध्ये कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे. पहाटेचा सुमारास 12 ते 14 अंश डिग््राी सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आलेले असते. तर, दुपारच्या सुमारास हेच तापमान 28 ते 30 डिग््राीपर्यंत पोहोचलेले असते. त्यामुळे मध्यरात्री व पहाटे कडाक्याची थंडी तर दिवसभर कडक ऊन असे वातावरण सध्या लोणावळ्यामध्ये अनुभवायला मिळत आहे.
शहरात वाहतूक कोंडी
थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या लोणावळा शहरांमध्ये सकाळच्या सुमारास व सायंकाळनंतर थंडी अनुभवायला मिळते. तर, दिवसभर उन्हाचा चटका सोसावा लागतो आहे. सध्या सुट्यांचा कालावधी सुरू असल्यामुळे अनेक पर्यटक येथील थंड हवेचा व वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. पुणे, मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांसह विविध राज्यांमधील पर्यटक लोणावळा शहरामध्ये दाखल झाले आहेत. अहमदाबाद, बडोदा, राजस्थान या भागातील पर्यटकांचा यामध्ये मोठा भरणा आहे. अनेक पर्यटक हे त्यांच्या खासगी वाहनांमधून येत असल्यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोणावळा शहर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल्स व खासगी बंगले आहेत. जवळपास सर्वच रहिवासी ठिकाणी ही पर्यटकांनी तुडूंब भरली असून, पुढील आठवडाभराचे बुकिंग झाले असल्याचे सांगितले जात आहे.
पर्यटकांची गर्दी वाढली
सायंकाळी पाचनंतर ते सकाळी साडेआठ नऊ वाजेपर्यंत थंड हवेचा व येथील गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटकांना अनुभवायला मिळत आहे. रात्रीच्यावेळी अक्षरशः शेकोटी करून बसवे लागत आहे. बंगले, फार्म हाऊस व टेन्ट या ठिकाणी पर्यटकांसाठी कॅम्प फायर केले जातात. रात्रीच्यावेळी घरातून बाहेर पडणेदेखील थंडीमुळे नकोशी वाटते व दुपारी उन्हाचा मोठा चटका बसत असल्यामुळेदेखील नागरिक घराबाहेर पडताना दिसत नाहीत. दुपारी उन्हाचा चटका लागत असला तरी एखाद्या झाडाखाली अथवा सावलीच्या ठिकाणी उभे राहिल्यानंतर हवेतील गारवा हा सुखद आनंद देणारा ठरत आहे.
सध्या भुशी धरणामधील पाणी हे तळाशी गेले असते तरी हे धरण पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. लोणावळा शहरापासून काही अंतरावर असलेल्या लायन्स पॉईंट या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी सूर्यास्त पाण्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी होत आहे. सोबतच खंडाळ्यातील राजमाची गार्डन, ड्युक्स नोज पॉइंट, सनसेट पॉईंट, खंडाळा बोटिंग क्लब, तुंगार्ली धरण परिसर, सहारा पूल या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
आई एकवीरा देवीच्या गडाकडे जाणाऱ्या मार्गावर कोंडी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई एकवीरा देवीच्या वेहेरगाव गडाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात दिवसभर वाहतूककोंडी झाली होती. कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यामुळे भाविक, पर्यटक तसेच स्थानिक ग््राामस्थांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरदेखील कार्ला फाट्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मळवली रेल्वे स्थानक परिसरातदेखील दुतर्फा मोठी वाहतूककोंडी झाली होती.