

पिंपरी: शहरातील पिंपरी मंडईमध्ये पालेभाज्यांचे दर आवाक्यात होते. मात्र शेवगा, वांगी, राजमा आणि घेवडा या भाज्यांचे दर काहीसे वाढलेले आहेत; भरताचे वांगे आणि शेवग्याचे दरही वाढलेले आहेत.
शहरातील चिंचवड, आकुर्डी, तसेच पिंपरी येथील लाल बहादुर शास्त्री भाजी मंडईतील किरकोळ बाजारात मेथी, पालक, चवळी, चुका, कोथिंबीर, प्रत्येकी सरासरी 15 ते 20 रुपयांना प्रति जुडी विक्री केली जात आहे. दोडका, पडवळ ,शिमला, बीन्स, कारली 70 ते 80 किलो दराने विक्री केली जात आहे. भरीताचे वांगी 80 ते 100 रुपये आणि शेवगा 350 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.
शेवग्याला मागणी आवक कमी
हिवाळयात रोगप्रतिकारक वाढविण्यासाठी आणि मधुमेह व इतर आजारांवर गुणाकारी असल्याने शेवग्याला जास्त मागणी असते; मात्र मागणीच्या तुलनेत शेवग्याची आवक कमी असल्याने दर वाढलेले आहेत.
मोशी उपबाजारातील घाऊक दर ( प्रतिकिलो ):
गाजर - 30 ते 40 वांगी 80 ते 100 शेवगा 350 भेंडी 80 ते 90 फ्लावर - 30 काळा राजमा - 80 ते 90 काकडी 40,कांदा 25,बटाटा 30, आले 80, मटार 30 ते 40 लसूण- 120 ते 140 रुपये प्रतिकिलो.
मोशी उपबाजार आवक (क्विंटलमध्ये):
कांदा- 766, बटाटा - 1032, आले- 68, गाजर - 278, गवार - 12, हिरवी मिरची- 133,टोमॅटो- 506 फ्लॉवर 492 काकडी- 170, कोंबी 338, वांगी 150, भेंडी 55 मोशी उपबाजारात पालेभाज्याची एकूण आवक 5 हजार 113 क्विंटल आणि चारशे 80 क्विंटल इतकी फळांची आवक झाली आहे.
पिंपरी मंडईतील भाज्यांचे किरकोळ भाव
पालेभाज्या (दर प्रति जुडी):
मेथी - 15 ते 20, कोथिंबीर- 10 ते 15, कांदापात - 20, शेपू - 20, पुदीना - 10, मुळा-30, पालक - 20, चवळी - 15 ते 20
फळभाज्याचे (किलोचे भाव):
कांदा - 25, आले- 80, लसूण 120 ते 140 रुपये किलो, भेंडी - 80 ते 90, मटार - 30 ते 40, फ्लॉवर - 30, कोबी - 40, काकडी 40, हिरवी मिरची 40 ते 50, राजमा - 80 ते 90, घोसाळे- 60, भरीताचे वांगे - 80 ते 100, शिमला- 60 ते 70 दोडका - 80, शेवगा - 350, कारले -60, पडवळ - 80, रताळे - 70 ते 80, घेवडा- 70 ते 80, दुधी भोपळा - 40, गाजर 30 ते 40 रुपये प्रति किलोने विक्री केली जात आहे.