Bhushi Dam overflow : लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरण ओव्हरफ्लो

Lonavala dam update : लोणावळ्यात वर्षाविहारासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे
Bhushi Dam overflow : लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरण ओव्हरफ्लो
Published on
Updated on

लोणावळा : शहरात मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे येथील प्रसिद्ध असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. आज (दि.3 जुलै) सकाळी धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. मागील 24 तासात लोणावळा शहरात 116 मिमी पाऊस झाला आहे.

Bhushi Dam overflow : लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरण ओव्हरफ्लो
jalgaon hatnur dam: जळगावकरांनो पाणी जपून वापरा! हातनूर धरणातील साठा घटला; केवळ ३०.८२ टक्केच शिल्लक

लोणावळा खंडाळा तसेच भुशी धरणाच्या वरील बाजूला असलेल्या डोंगर भागात पाऊस सुरू आहे. काल (दि.2 जुलै) तीन ते चार फूट खाली असलेले धरण सकाळपर्यंत पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या भिंतीवरून पायऱ्यांवर पाणी येऊ लागले आहे. त्यामुळे उद्याच्या शनिवार व रविवारी लोणावळ्यात वर्षाविहारासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Bhushi Dam overflow : लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरण ओव्हरफ्लो
हतनूर धरणात जलसंकट! गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमालीचा घटला; 'या' शहरांवर टंचाईचे सावट

धरण परिसरात पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, तसेच पायऱ्यांवरून पाणी वाहत असताना अतिउत्साहात काहीही करू नये, असे सूचित करण्यात आले आहे. भुशी धरणाचे हे विलोभनीय रूप पाहण्यासाठी आणि पावसाळी पर्यटन अनुभवण्यासाठी पर्यटकांची लगबग वाढणार असून, यामुळे स्थानिक व्यवसायांनाही मोठी चालना मिळणार आहे. मागील काही दिवसांच्या पावसाने लोणावळ्यातील जलस्त्रोत पूर्णपणे भरले असून, निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसू लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news