Smita Jadhav: पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव यांना डॉक्टर असोसिएशनचा पाठिंबा

सांगवी, पिंपळे गुरव, दापोडीतील डॉक्टरांचा पाठिंबा; लोणावळ्यात बाळा भेगडे यांच्याकडून पदवीधर व शिक्षक मतदारांशी संपर्क
Pune Graduate Constituency Smita Jadhav Doctors Association Support
Pune Graduate Constituency Smita Jadhav Doctors Association SupportPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपळे गुरव: पुणे पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना सांगवी, पिंपळे गुरव आणि दापोडी परिसरातील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

Pune Graduate Constituency Smita Jadhav Doctors Association Support
Pimpri Dandiya Dispute: पिंपरीत दांडियाच्या जुन्या वादातून दोन गटांत राडा; कोयत्याने हल्ला, सहा जणांना अटक

वैद्यकीय क्षेत्रातील प्रश्न, डॉक्टरांचे हक्क व हितसंबंध आणि आरोग्य व्यवस्थेतील सुधारणांसाठी सकारात्मक भूमिका घेण्याच्या अपेक्षेने हा पाठिंबा देण्यात आला. वैद्यकीय प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी प्रभावीपणे कार्य करावे, अशी अपेक्षा असोसिएशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या संदर्भातील पाठिंब्याचे पत्र डॉ. प्रदीप ननवरे, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. सुनील पाटील, डॉ. रितू लोखंडे आणि अर्चना शिंदे यांनी दिले. वैद्यकीय क्षेत्रासह सर्व पदवीधरांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून त्यांच्या हितासाठी काम करण्याची अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.

Pune Graduate Constituency Smita Jadhav Doctors Association Support
Pimpri Chinchwad Water Wastage: पाणीटंचाईच्या काळात महापालिकेचे टँकर बीआरटीचे दुभाजक धुण्यासाठी!

महायुतीचे उमेदवार विजयी करा : बाळा भेगडे

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी लोणावळा शहरातील पदवीधर मतदार व शिक्षकांची भेट घेत त्यांना डॉ. स्मिता योगेश जाधव व कौस्तुभ गावडे यांना पसंती क्रमांक १ चे मत देत भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

Pune Graduate Constituency Smita Jadhav Doctors Association Support
Pimpri Appughar Amusement Park: पिंपरीतील अप्पूघर १५ वर्षांसाठी ठेकेदाराच्या घशात; सुरक्षेची प्रमाणपत्रेच गायब!

लोणावळा शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन शिक्षकांची प्रत्यक्ष भेट या वेळी घेण्यात आली. तसेच, लोणावळा शहर व परिसरातील पदवीधर मतदारांच्या भेटी घेत त्यांना दोन्ही उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्‍या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिले आहे. त्‍यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ असा अभ्यास आहे.

Pune Graduate Constituency Smita Jadhav Doctors Association Support
Pune MLC Election: महायुतीच्या उमेदवारांना विजय करण्याचा आ. गोरखे यांचा संकल्‍प; संत तुकारामनगर, कासारवाडी, खराळवाडी मंडळाचा पाठिंबा

शिक्षण क्षेत्रातील विविध बदलांसह पदवीधरांसाठी त्या निश्चितपणे मोठे काम करतील व पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावतील, असा विश्वास या वेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केला. महायुतीचे हे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित व शिक्षक पदवीधर यांच्या प्रश्नांची जाण असणारे आहेत. लोणावळा शहरातील मतदान केंद्र हे लोणावळा येथेच असणार आहे. या ठिकाणी उमेदवारांच्या नावासमोर पसंती क्रमांक १ चे मत नोंदवत त्यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे. डॉ. स्मिता योगेश जाधव यांना कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या सर्वच भागांमधून मोठे मताधिक्य प्राप्त होईल, असा विश्वास या वेळी भेगडे यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांच्यासोबत भाजप लोणावळा मंडळ प्रभारी प्रशांत भागवत, लोणावळा नाणेमावळ मंडळ अध्यक्ष अनिल गायकवाड, हर्षल होगले, अर्जून पाठारे, महिला अध्यक्ष परीच्या भिलारे, चारुलता कमलवार आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news