PCMC RTO Environment Tax: पिंपरी-चिंचवडमध्ये आरटीओची धडक मोहीम; पर्यावरण कर न भरल्यास कडक कारवाई

15 वर्षांवरील वाहनधारकांवर लक्ष; वर्षभरात 9.56 कोटींची दंड वसुली
Tax
TaxPudhari
Published on
Updated on

पिंपरी: प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) पर्यावरण कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. 15 वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांसाठी हा कर अनिवार्य असून, तो न भरल्यास दंडासह व्याज आकारले जाणार आहे. सध्या शहरात आरटीओच्या वायुवेग पथकाची धडक मोहीम सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

Tax
Pimpri Chinchwad Investment Fraud: पिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणूक फसवणुकीचा सुळसुळाट; 44 लाखांचा गंडा

आरटीओकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या मोहिमेदरम्यान वर्षभरात 37 हजार 438 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातून 9 कोटी 56 लाख 90 हजार 295 रुपयांचा दंड वसुली करण्यात आली आहे. यावरून शहरात अनेक वाहनधारकांनी पर्यावरण कर भरण्याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.

Tax
PCMC CTO Expense: पिंपरी-चिंचवड महापालिकेत सीटीओ खर्चावर प्रश्नचिन्ह; कोट्यवधी खर्चूनही प्रकल्प रखडले

पर्यावरण कर का महत्त्वाचा?:

पर्यावरण कराचा उद्देश केवळ महसूल गोळा करणे नसून, शहरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे हा आहे. जुनी वाहने अधिक धूर व प्रदूषण निर्माण करतात. त्यामुळे अशा वाहनांची तपासणी करून ती सुरक्षित व पर्यावरणपूरक आहेत की नाही, याची खात्री करून घेतली जाते. हा कर भरल्यानंतर वाहनाला पुढील पाच वर्षांसाठी वाहन वैधता मिळते.

Tax
Pimpri News: महापालिका आयुक्तांच्या ‌‘त्या‌’ वक्तव्यावरून शहरभरातून संताप

कर न भरल्यास जागेवरच दंड आकारणी

पिंपरी-चिंचवड शहरात आरटीओच्या वायुवेग पथकाने विविध ठिकाणी तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. विशेषतः 15 वर्षांपेक्षा जुनी वाहने लक्ष्य करून त्यांच्याकडून कर वसूल केला जात आहे. या मोहिमेत कर न भरलेल्या वाहनांना तत्काळ नोटीस दिली जाते. जागेवरच दंड आकारला जातो. आवश्यक असल्यास वाहन जप्त करण्याची कारवाईही केली जाते.

कर भरण्याचे आरटीओकडून आवाहन

शहरातील काही वाहनधारक वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करीत आहेत. त्यामुळे पंधरा वर्षांहून अधिक वर्ष झालेली वाहने मोठ्या प्रमाणात धावत आहे. यामुळे होणारे प्रदूषण अधिक आहे. अशा वाहनधारकांना आरटीओकडून कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tax
Pimpri-Chinchwad Rain: पावसामुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या; महापौर रवी लांडगे यांचे आदेश

चारचाकी वाहनांकडून अधिक दंड

शहरातील चारचाकी वाहनांकडून सर्वाधिक चार कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हा दंड भरताना वाहनचालकांकडून व्याजासहित रक्कम आकारली असून ती 29 लाख 45 हजार रुपये आहे.

मुदतीपूर्वी कर न भरल्यास काय?

  • थकीत करावर दर महिन्याला 2 टक्के व्याज आकारणी.

  • दंडासह एकत्रित रक्कम वसूल केली जाते.

  • दीर्घकाळ कर न भरल्यास कडक कारवाई होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news