Jambhul Crime: जांभूळ येथील खून प्रकरणात आठ आरोपींना जन्मठेप; मावळ सत्र न्यायालयाचा निकाल

सहा वर्षांपूर्वी एक्झर्बिया सोसायटीजवळ तरुणाचा झाला होता खून; खुनासह खुनाचा प्रयत्न आणि अन्य गुन्ह्यांत शिक्षा
Life Imprisonment
Life ImprisonmentPudhari
Published on: 
Updated on: 

वडगाव मावळ: खून, खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर गुन्ह्यांप्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आठ आरोपींना वडगाव मावळ येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Life Imprisonment
Lonavala Encroachment Drive: अतिक्रमण कारवाईविरोधात लोणावळेकरांचा एल्गार; शहर बंदला संमिश्र प्रतिसाद

या खटल्यात सुनील शंकर शिंदे (वय ४२), सतीश शंकरराव शिंदे (वय ३८), बबन दगडू शिंदे (वय ५३), बाळू मारुती गोसावी (वय ४८), ऋषिकेश सुरेश शिंदे (वय ३३), दगडू उर्फ सुभाष अशोक खांडभोर (वय ३२), शंकर अनंतराव शिंदे (वय ७२) आणि पंकज बाळू खांडभोर (वय ३५) या आठ आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली, तर सुरेश रामभाऊ देशमुख हा आरोपी फरारी आहे.

Life Imprisonment
Pimpri Chinchwad New Post Offices: पिंपरी-चिंचवडमध्ये पाच नवीन टपाल कार्यालये सुरू होणार; नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये आठही दोषी आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, तसेच कलम ३०७ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Life Imprisonment
Census 2027: जनगणना २०२७ पिंपरी-चिंचवडमध्ये १० जानेवारीपासून डिजिटल स्वगणना

याशिवाय आरोपी शंकर शिंदे याला कलम ३५४ अन्वये ५ वर्षांची शिक्षा व १० हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे. तसेच, इतर विविध कलमांनुसार दोन वर्षे साधा कारावास, कलम ३४१ अंतर्गत एक महिना सक्तमजुरी, कलम ५०६ अंतर्गत सात वर्षे सक्तमजुरी, कलम १४३ अंतर्गत सहा महिने साधा कारावास, कलम १४७ अंतर्गत दोन वर्षे साधा कारावास आणि कलम १४८ अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Life Imprisonment
Electric Vehicle Mechanics: इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली; कुशल मेकॅनिकची मोठी गरज

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता पुष्कर सप्रे यांनी काम पाहिले. तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चामे यांनी केला. प्रभारी पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गादेकर, पोलिस कर्मचारी के. व्ही. नांगरे, हवालदार प्रतीक केदारे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी तावरे यांनी खटल्याच्या कामकाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

सहा वर्षांपूर्वी जांभूळ येथे घडला होता गुन्हा

१९ जानेवारी २०२१ रोजी जांभूळ येथे एक्झर्बिया सोसायटीजवळ फिर्यादी ही तिची मुले शुभम व प्रशांत यांच्यासह ईरटीका गाडीने जात असताना पाठीमागून स्विफ्ट व इको गाडीतून आलेल्या आरोपींनी तुला गाडी नीट चालवता येत नाही का, असे विचारून दोघांना शिवीगाळ व लोखंडी कोयता, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शुभमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याबाबत संबंधित आरोपी विरुद्ध वडगाव मावळ पोलिस ठाण्यात खून व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.