Census 2027: जनगणना २०२७ पिंपरी-चिंचवडमध्ये १० जानेवारीपासून डिजिटल स्वगणना

१० ते २४ जानेवारीदरम्यान ऑनलाइन माहिती भरण्याची सुविधा; २५ जानेवारीपासून प्रगणक घरोघरी जाऊन करणार लोकसंख्या गणना
Census 2027 Digital India
Census 2027 Digital IndiaPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत १० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत नागरिकांना डिजिटल स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत प्रगणकांमार्फत प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन माहिती जमा केली जाणार आहे. नागरिकांनी अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय उपक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Census 2027 Digital India
Electric Vehicle Mechanics: इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली; कुशल मेकॅनिकची मोठी गरज

जनगणनेचा पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार (दि. २१) मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक झाली. बैठकीस आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याचे नियोजन, स्वगणना मोहीम व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबाबत त्यात मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना १० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन नोंदविता येणार आहे.

Census 2027 Digital India
Kasarwadi Swimming Pool: पाच महिन्यांनंतर कासारवाडीचा जलतरण तलाव सुरू; अस्वच्छता आणि सुरक्षेच्या त्रुटींमुळे नागरिकांची नाराजी

यासाठी पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगिन करून कुटुंबातील सर्व सदस्यांची अचूक माहिती भरावी लागणार आहे. यापूर्वी लॉगिन न केलेल्या नागरिकांनाही नव्याने लॉगिन करून आपल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती नोंदविता येणार आहे. माहिती सादर केल्यानंतर P अक्षराने सुरू होणारा ११ अंकी स्वगणना ओळख क्रमांक (एसईआयडी) मिळणार आहे. हा क्रमांक जतन करून ठेवणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष घर भेटीदरम्यान प्रगणकांना हा क्रमांक दाखविल्यास माहिती पडताळणीची प्रक्रिया सुलभ होऊन नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. अधिक माहितीसाठी : नागरिकांनी www.censusindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच, १८५५ या राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे, असे प्रधान जनगणना अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले.

Census 2027 Digital India
Talegaon Dabhade Municipal Council: तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सत्तेला वर्ष पूर्ण; विकासकामांसह नव्या नियुक्त्यांचे आव्हान

२५ जानेवारीपासून कर्मचाऱ्यांकडून घरांना भेटी

स्व-गणनेनंतर २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत प्रगणक (कर्मचारी) प्रत्यक्ष घरोघरी जाऊन लोकसंख्येची गणना करणार आहेत. त्यानंतर १ ते ५ मार्च २०२७ या कालावधीत पुनरीक्षण फेरी राबविण्यात येणार आहे. डिजिटल सुविधेचा लाभ घेतल्यास नागरिकांना माहिती नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः तरुणांनी व तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या कुटुंबांनी स्वगणना सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

जनगणनेदरम्यान जमा करण्यात येणारी नागरिकांची वैयक्तिक व कौटुंबिक माहिती जनगणना कायदा, १९४८ अंतर्गत गोपनीय ठेवली जाते. या माहितीचा वापर कायद्याने निश्चित केलेल्या जनगणनेच्या उद्देशांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी केला जात नाही. जनगणनेच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीकडून ओटीपी, पिन किंवा अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी केवळ अधिकृत माध्यमांद्वारेच माहिती द्यावी. सोशल मीडियावर होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Census 2027 Digital India
Lonavala Bandh: अतिक्रमण कारवाईविरोधात लोणावळा बंदची हाक; व्यापारी, नागरिकांचा सोमवारी सहभाग

कर्मचाऱ्यांना अचूक माहिती द्यावी

जनगणनेत शहरातील प्रत्येक कुटुंबाची अचूक माहिती नोंदविली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वगणना सुविधेचा लाभ घ्यावा. प्रगणक घरी आल्यानंतर त्यांना योग्य व संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

कोणतीही माहिती लपवू नका

जनगणनेसाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक पूर्वतयारी व समन्वय साधण्यात येत आहे. नागरिकांनी स्वगणना प्रक्रियेत स्वतःहून सहभाग घ्यावा. कर्मचारी गृहभेटीसाठी आल्यानंतर त्यांना संपूर्ण व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. कोणतीही माहिती लपवू नये किंवा चुकीची माहिती देऊ नये, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.