Hinjewadi PMRDA Development: पिंपरी-चिंचवडमध्ये हिंजवडीचा समावेश झाला तरी सुरू कामे पीएमआरडीए पूर्ण करणार

हिंजवडीसाठी ४२६ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी; चाकणमध्ये सात रस्त्यांची कामे, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी पाच निविदा
PMRDA
PMRDA Pudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत हिंजवडीचा समावेश करण्यास आमचा विरोध नाही. राज्य सरकार तसा निर्णय घेऊ शकते. मात्र, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएआरडीए) सध्या सुरू असलेली कामे आम्हीच पूर्ण करू, असे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे, असे पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी (दि. 29) सांगितले.

PMRDA
Pimpri Chinchwad BJP: पिंपरी भाजपमध्ये पदांसाठी ‘पक्षनिष्ठे’चा निकष; रवींद्र चव्हाणांचे स्पष्ट निर्देश

आकुर्डीतील पीएमआरडीएच्या इमारतीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि अधिकारी उपस्थित होते. 'पुढारी' वृत्तवाहिनीच्या व्यासपीठावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडी आयटी पार्क परिसराचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करणारा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यासंदर्भात विचारले असता आयुक्त बोलत होते.

PMRDA
Maval Kharif Crop Crisis: मावळात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके करपली; शेतकरी दुहेरी संकटात

आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले की, हिंजवडीचा महापालिकेत समावेश करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. तो ते निर्णय घेऊ शकतात. त्याबाबत अद्याप आमचा अभिप्राय मागितलेला नाही. तसेच, त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात तसा निर्णय घेतला तर, आम्ही तयार आहोत. आमचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, हिंजवडी भागात सध्या सुरू असलेली रस्ते, ड्रेनेजलाइन, पदपथ व इतर कामे आम्ही पूर्ण करू, असे मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. हिंजवडीचा महापालिकेत समावेश झाल्यास पीएमआरडीएवर काय परिणाम होईल, आर्थिक भार व इतर कारणांचा अहवाल राज्य सरकारला सादर करू. तसेच, आमची बाजू मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

PMRDA
Indrayani River Rejuvenation Project: इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पावर प्रश्नचिन्ह; जागा ताब्यात नसताना १०० टक्के हमीपत्र दिल्याचा आरोप

हिंजवडीसाठी 426 कोटींचा निधी

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित 426 कोटी खर्चाच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 28) मान्यता दिली आहे. रस्ते तयार करणे, पदपथ, ड्रेनेजलाइन नव्याने टाकणे आदी कामे केली जाणार आहेत. टीडीआरद्वारे मोबदला देऊन पार्किंगसाठी शेतीच्या जागा ताब्यात घेण्यात येणार आहेत. रस्त्यासाठी जशी जागा ताब्यात येईल तसे तातडीने काम केले जाणार आहे. तेथील अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत जाहिरात होर्डिंग हटवण्यासाठी मनुष्यबळ वाढण्यात येत आहे. त्यासाठी सर्वेक्षणही करण्यात आले आहे. तसेच, यंत्रसामग्री खरेदी करण्यात येत असून, महापालिकेप्रमाणे अतिक्रमणविरोधी विभाग सुरू करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. जाहिरात होर्डिंगची नोंदणी आता केवळ ऑनलाइन माध्यमातून करता येणार आहे. अनधिकृत होर्डिंग तोडण्याची कारवाई सुरू आहे, असे अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.

चाकणमध्ये सात रस्त्यांची कामे सुरू

चाकण एमआयडीसी भागात सात रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. ते काम डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल. त्यानंतर तेथील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. तसेच, वेस्टर्न बायपासचा रस्ता महामार्गास जोडण्यात येणार आहे. इतर ठिकाणच्या जागा रोखीने ताब्यात घेऊन रस्ते विकसित केले जाणार आहेत, असे आयुक्तांनी सांगितले. नाशिक फाटा ते राजगुरुनगर रस्तारुंदीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

PMRDA
Pimpri Afghan Student Detained: पिंपरीत व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्य; अफगाण विद्यार्थ्याला ताब्यात

चाकण एमआयडीसी भागात कचरा डेपो विकसित करणार

चाकण एमआयडीसी परिसरातील एकूण 17 गावे आणि दोन नगरपंचायत या भागांसाठी स्वतंत्र कचरा प्रक्रिया केंद्र चाकण एमआयडीसी भागात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एमआयडीसीने 36 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रात वीस किलोमीटर परिसरातील भागांत कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठीचे टिफिंग चार्जस इतरांच्या तुलनेत कमी असणार आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी पाच ठेकेदारांचा प्रतिसाद

पीएमआरडीएच्या वतीने इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी पाच ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात एकूण 97 नाले आढळून आले आहेत. दोन ते तीन नाले एकत्रित करून सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) निर्माण केले जाणार आहेत. तसेच, पवना नदीसुधार प्रकल्पांची निविदाप्रक्रिया सुरू असून, लवकरच निविदा उघडली जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news