Pimpri Afghan Student Detained: पिंपरीत व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्य; अफगाण विद्यार्थ्याला ताब्यात

एटीबी आणि एफआरओची बावधनमध्ये कारवाई; मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू
Foreign Citizen
Foreign CitizenPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: निवासी परवान्याची मुदत संपल्यानंतरही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्याला दहशतवाद विरोधी शाखा (एटीबी) आणि परदेशी नागरिक नोंदणी विभाग (एफआरओ) यांनी ताब्यात घेतले. बावधन येथे सोमवारी (दि. २८) ही कारवाई करण्यात आली. संबंधित विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन त्याला मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दान्यार हुसेन (२६, मूळ अफगाणिस्तान) असे ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बावधन येथील पेबल्स अरवेनिया सोसायटी, सिद्धार्थनगर परिसरात राहत होता.

Foreign Citizen
Pimpri Chinchwad Cyber Crime Awareness: पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्ह्यांविरोधात ३१ दिवसांचा ‘ॲक्शन प्लान’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार आयुक्तालयाच्या हद्दीत अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचा शोध सुरू आहे. दहशतवाद विरोधी शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन हा बावधन परिसरात राहत असल्याचे समोर आले. त्यानुसार, दहशतवाद विरोधी शाखा आणि परदेशी नागरिक नोंदणी विभाग यांच्या पथकाने त्याच्या निवासस्थानी जाऊन पडताळणी केली.

Foreign Citizen
Talegaon Land Acquisition Compensation: तळेगावातील ४७३ एकर भूसंपादनाचा वाढीव मोबदला कधी मिळणार? शेतकऱ्यांचे बैठकीकडे लक्ष

हुसेन हा शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात एम.ए. (अर्थशास्त्र)च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. मात्र, जानेवारी २०२६ पासून तो महाविद्यालयात गैरहजर असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्याच्याकडील पासपोर्ट आणि विद्यार्थी व्हिसाची तपासणी केली असता पासपोर्टची मुदत २६ जून २०२७ पर्यंत होती.

Foreign Citizen
PMPML Online Complaint: पीएमपीएमएल प्रवाशांसाठी मोठी सुविधा; ॲपवरून ऑनलाइन तक्रार नोंदवता येणार

मात्र, भारतात वास्तव्यासाठी असलेल्या त्याच्या निवासी परवान्याची मुदत ३१ जानेवारी २०२६ रोजी संपली होती. त्यानंतर मुदतवाढ न घेताच तो भारतात राहत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. बावधन पोलिस आणि परदेशी नागरिक नोंदणी विभागामार्फत (एफआरओ) त्याला अफगाणिस्तानला पाठविण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.

Foreign Citizen
ST NCMC Smart Card Helpline: एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी हेल्पलाइन सुरू; प्रवाशांच्या तक्रारींचे होणार निवारण

पोलिसांचे आवाहन

परदेशी नागरिकांना घर, बंगला, सदनिका अथवा हॉटेलमध्ये वास्तव्यास ठेवणाऱ्यांनी त्याबाबतचा 'सी-फॉर्म' २४ तासांच्या आत परदेशी नागरिक नोंदणी विभागाकडे (एफआरओ) सादर करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परिसरात एखादा परदेशी नागरिक मुदत संपल्यानंतरही अनधिकृतपणे राहत असल्याचे निदर्शनास आल्यास परदेशी नागरिक नोंदणी विभाग (एफआरओ) किंवा दहशतवाद विरोधी शाखेला (एटीबी) तत्काळ माहिती देण्याचे आवाहन पिंपरी- चिंचवड पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news