ThinkTech India fraud Hinjawadi: थिंकटेक इंडिया फसवणूक प्रकरण; सीईओ हर्षल ठाकरेला अटक, 11 लाखांचा घोटाळा उघड

नोकरी व प्रशिक्षणाच्या नावाखाली फसवणूक; एचआर व प्रशिक्षण विभागप्रमुखांवरही गुन्हा दाखल
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

पिंपरी: फेशर्सना नोकरी आणि प्रशिक्षणाचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी थिंकटेक इंडिया ओपीसी लिमिटेड कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हर्षल भानुदास ठाकरे याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी (दि. 3) त्याला न्यायालयात हजर केले असता 9 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात कंपनीच्या प्रशिक्षण विभागप्रमुख धुविल पारेख, एचआरप्रमुख सौम्या सिंग तसेच इतर संबंधितांविरोधातही गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

Arrest
Pimpri Yamunanagar Water Pipeline Burst: यमुनानगरमध्ये जलवाहिनी फुटली; तीन दिवस लाखो लिटर पाणी वाया

याप्रकरणी सौरव राजन नायर (25, रा. देहूरोड) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी सप्टेंबर 2025 ते 1 जून 2026 या कालावधीत हिंजवडी फेज 2 येथील गेरा इम्पेरिअम राईजमधील कार्यालयातून संगनमताने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विविध ठिकाणच्या फेशर्सना आकर्षक पगाराची नोकरी आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. कंपनीत ट्रेनी म्हणून नियुक्ती देताना लॅपटॉप, प्रशिक्षण साहित्य आणि इतर सुविधांच्या नावाखाली प्रत्येकी 15 हजार रुपयांची अनामत रक्कम घेतली जात होती. त्यानंतर उमेदवारांकडून दोन महिन्यांपर्यंत काम करून घेण्यात आले. मात्र, त्यांना आश्वासनानुसार वेतन देण्यात आले नाही. तसेच, जमा केलेली अनामत रक्कमही परत करण्यात आली नाही.

Arrest
Pimpri Masulkar Eye Hospital: मासुळकर नेत्र रुग्णालयात रुग्णांची वाढती गर्दी; रेटिना व बुबुळ रोपण सुविधेची प्रतीक्षा

तपासादरम्यान अनेक तरुणांना एकाच पद्धतीने जाळ्यात ओढण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधितांकडून काम करून घेतल्यानंतर विविध कारणे सांगून त्यांना नोकरीवरून कमी करण्यात येत होते. या संपूर्ण प्रकारातून फिर्यादीसह अनेक उमेदवारांची एकूण 11 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, कंपनीने यावर्षी एप्रिल महिन्यात कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामकाज बंद केले. कंपनीचे कार्यालय बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी हर्षल ठाकरे याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने चौकशीसाठी सहकार्य केले नाही.

Arrest
Fugewadi Toxic Liquor Case: फुगेवाडी विषारी दारूकांड तपासात मोठा निर्णय; CID पथकाला पोलिस बंदोबस्ताची सक्ती

त्यानंतर पोलिसांनी फसवणूक आणि विश्वासघाताचे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांच्या पथकाने नाशिकमधील आडगाव येथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 9 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात कंपनीच्या एचआर प्रमुख सौम्या सिंग, प्रशिक्षण विभागप्रमुख धुविल पारेख आणि इतर संबंधितांच्या भूमिकेचीही चौकशी सुरू असूर्नें फसवणुकीचे आणखी बळी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.

Arrest
Pawana Closed Water Pipeline Project: पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाला गती; 15 वर्षांनंतर 1200 कोटींचा मार्ग मोकळा

सरकारी प्रकल्प मिळविण्यासाठी रणनीती

पोलिस तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती करून कंपनीचे स्वरूप मोठे असल्याचे भासविण्यात आले होते. सरकारी आयटी प्रकल्प मिळविण्याच्या उद्देशाने ही रणनीती आखण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची गरज भासेल असा कोणताही प्रकल्प कंपनीकडे नसल्याचे तपासात उघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news