Pimpri Property Tax Collection: पिंपरी-चिंचवडमध्ये 715 कोटींचा मालमत्ताकर जमा; 2 लाखांहून अधिक मिळकती थकबाकीत

महापालिकेचे आवाहन – तातडीने कर भरा, अन्यथा जप्ती व विलंब दंडाची कारवाई संभव
Property Tax
Property Tax Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 7 लाख 32 हजार 302 मिळकतींची नोंद महापालिकेकडे आहे. त्यापैकी 5 लाख 26 हजार 226 मालमत्ताधारकांनी आतापर्यंत मालमत्ताकराचे बिल भरले आहे. अद्याप 2 लाख 6 हजार 76 मालमत्ताधारकांनी मालमत्ताकराचा भरणा केलेला नाही. चालू वर्षाचा मालमत्ताकर थकबाकीसह तातडीने भरावा, असे आवाहन महापालिकेच्या कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

Property Tax
Matrimonial Fraud Scam: लग्नाच्या आमिषाने सायबर फसवणूक; पिंपरीतील तरुणाचे 90 लाख लंपास

करसंकलन विभागामार्फत पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत मालमत्ताकर भरणाऱ्या नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देण्यात आल्या होत्या. या सवलतींचा लाभ घेत अनेक नागरिकांनी वेळेत कर भरला असून, यामुळे कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे.

Property Tax
Pune Metro Line 3 Women Pilots: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो महिलांच्या हाती; ‘पिंक लाईन’वर महिला ट्रेन पायलट

महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन, रोख, धनादेश तसेच, ई-डीसीएस या विविध सुलभ माध्यमांचा लाभ घेत मालमत्ताधारक मोठ्या प्रमाणात बिल भरणा करत आहेत. विशेषतः ऑनलाईन कर भरण्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत तब्बल 715 कोटी रुपयांचा भरणा महापालिका तिजोरीत झाला आहे. अद्याप ज्या मालमत्ताधारकांनी मालमत्ताकर भरलेला नाही, त्यांनी तो भरून विलंब दंड तसेच, कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Property Tax
PCMC Officers Transfer Order: खाबूगिरीला आळा घालण्यासाठी महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या

कर भरून जप्ती कारवाई टाळावी

ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ताकराचा भरणा केलेला नाही, त्यांनी तातडीने बिल भरावे. महापालिकेने कर भरण्यासाठी सुलभ आणि विविध माध्यमे उपलब्ध करून दिली आहेत. वेळेत कर भरल्यास विलंब दंड तसेच, जप्ती अथवा इतर कारवाई टाळता येईल. नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील 18 विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार व रविवार आणि सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आली आहेत, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.

Property Tax
Pimpri Chinchwad Police Recruitment: पिंपरी-चिंचवड पोलिस भरतीची मैदानी चाचणी सुरू; 462 पदांसाठी 14,779 अर्ज

ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांचा वाढता प्रतिसाद

  • ऑनलाइन बिल भरणारे -4 लाख 30 हजार 279

  • रोखीने बिल भरणारे - 56 हजार 450

  • धनादेशाद्वारे बिल भरणारे -12 हजार 511

  • बीबीपीएसद्वारे बिल भरणारे - 26 हजार 881

  • ई-डीसीएसने बिल भरणारे - 105

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news