Pimpri Railway Station Women Facilities: पिंपरी रेल्वे स्थानकात महिलांची मोठी गैरसोय; स्वच्छतागृह बंद, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पाणी, प्रकाश व आरपीएफ जवानांचा अभाव; मद्यपी व भिक्षेकऱ्यांच्या वावरामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना
Pimpri Railway Station
Pimpri Railway StationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या पिंपरी रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पिंपरी रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृह बंद असल्याने महिलांना गंभीर समस्येका सामोरे जावे लागत आहे, ज्याचा थेट परिणाम रेल्वे प्रवाशांवरही होत आहे.

Pimpri Railway Station
Pimpri Property Tax Collection: पिंपरी-चिंचवडमध्ये 715 कोटींचा मालमत्ताकर जमा; 2 लाखांहून अधिक मिळकती थकबाकीत

पिंपरी येथील रेल्वे स्थानकातून कामानिमित्त पुणे तसेच लोणावळ्याकडे दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. यामध्ये महिलांची संख्याही मोठी आहे; मात्र या स्थानकात महिलांसाठी सुविधा अपुऱ्या आहेत. येथील स्वच्छतागृह बंद असल्याने महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होते. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, या रेल्वे स्थानकांत महिलांच्या सुरक्षिततेसाठी आरपीएफ जवान नसल्याचे चित्र आहे. येथील स्थानकात मद्यपी तसेच भिक्षेकऱ्यांचा वावर वाढला आहे. या स्थानकांत बाकड्यांवर भिक्षेकरी झोपलेले असतात.

Pimpri Railway Station
Matrimonial Fraud Scam: लग्नाच्या आमिषाने सायबर फसवणूक; पिंपरीतील तरुणाचे 90 लाख लंपास

त्यामुळे प्रवाशांना उभे राहून रेल्वेगाडयांची वाट पाहावी लागत आहे. तसेच सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. अनेक रेल्वेस्थानक स्वच्छता गृह बंद अवस्थेत असल्याने, नाईलाजाने प्रवासी उघडयावर लघुशंका करतात. त्यामुळे सर्व परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच ठिकठिकाणी राडारोडा व कचरा पडून आहे.

पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचा अभाव

पिंपरी स्थानकात चार ते पाच ठिकाणी प्रवाशांच्या सुविधेसाठी नळ बसविण्यात आले आहेत; परंतु पाणीच उपलब्ध नसल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.मृणाली लाड, महिला प्रवासी

Pimpri Railway Station
Pune Metro Line 3 Women Pilots: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो महिलांच्या हाती; ‘पिंक लाईन’वर महिला ट्रेन पायलट

रेल्वेस्थाकांत ऑनलाईन तिकीट व्हेंडिंग मशीन उपलब्ध आहेत. मात्र अनेक मशीन बंद असल्यामुळे ते केवळ शोभेसाठी आहेत. तिकीट काढण्यासाठी तुम्ही मशीन जवळ जाता त्या ठिकामी मद्यपी झोपलेले असतात.

गीतांजली पवार, प्रवासी

देहूरोड किंवा चिंचवड स्टेशन परिसरात विद्युत दिवे नसल्याने रात्री अंधाराचा सामना करत महिलांना येथील स्थानकांतून ये-जा करावी लागते; तसेच स्टेशन परिसरात काही टवाळखोर देखील बसलेले असतात. एखादा अपप्रसंग घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?

मृणाली लाड, महिला प्रवासी

Pimpri Railway Station
PCMC Officers Transfer Order: खाबूगिरीला आळा घालण्यासाठी महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या

प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून शहर परिसरातील सर्व स्थानकांत योग्य त्या सुविधा लवकरच निर्माण केल्या जातील.

हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी रेल्वे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news