Dehu Road Bike Theft Gang: देहूगावात मोटारसायकल चोरटोळीचा पर्दाफाश; तिघे अटकेत

देहूरोड पोलिसांची कारवाई; चार दुचाकी व ऑटोरिक्षासह सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
Dehu Road Bike Theft
Dehu Road Bike TheftPudhari
Published on
Updated on

देहूगाव: देहूरोड पोलिसांनी गस्तीदरम्यान मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चार मोटारसायकलसह एक ऑटोरिक्षा असा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Dehu Road Bike Theft
Weather Change Health Issues: बदलत्या हवामानाचा फटका; तळेगाव दाभाडेत रुग्णसंख्येत वाढ

देहूरोड पोलिस पथक परंडवाल चौक परिसरात गस्तीवर असताना पेट्रोल पंपाजवळ नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल घेऊन फिरणारा एक संशयित युवक आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सदर मोटारसायकल चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. ईश्वर संदीप गजे (वय 22, रा. खालुंबे, ता. खेड, मूळ रा. अकोला, शिवाजीनगर एस.टी. स्टँड मागे, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Dehu Road Bike Theft
Pimpri Chinchwad Sports Club Project: पिंपरी-चिंचवडचा बहुउद्देशीय स्पोर्ट्स क्लब प्रकल्प कागदावरच; खेळाडूंमध्ये नाराजी

अधिक तपासात ईश्वर गजे याने अनिकेत ऊर्फ छोट्या संतोष विटकर (वय 20, रा. विठ्ठलवाडी, पाण्याच्या टाकीजवळ, देहूगाव) व आर्यन ऊर्फ एस. पी. आनंदा राऊत (वय 19, रा. मोशी, भारतमाता चौक, गायकवाड वस्ती) हे दोघेही मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याची माहिती दिली. त्यानुसार, देहूरोड पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून चार मोटारसायकली व एक ऑटोरिक्षा असा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Dehu Road Bike Theft
Pimpri Chinchwad Mayor Election: पिंपरी-चिंचवड महापौरपदासाठी रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज

आरोपी अनिकेत विटकर याच्याविरुद्ध यापूर्वीचेही तीन गुन्हे दाखल असून, आरोपी आर्यन राऊत याच्याविरुद्ध मोटारसायकल चोरी व आर्म ॲक्ट 4 (25) अंतर्गत गुन्हे नोंद आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Dehu Road Bike Theft
Talegaon Dabhade Weekly Market Issues: तळेगाव दाभाडेतील आठवडे बाजार नागरिकांसाठी ठरत आहे डोकेदुखी

या कामगिरीत पोलिस निरीक्षक लखनकुमार वाव्हळे, पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे तसेच पोलिस अंमलदार किरण खेडकर, बाळासाहेब विधाते, सुरेश ढवळे, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडिक, शुभम बावनकर, अमोल माने व मोमीन शेख यांनी सहभाग घेतला असल्याची माहिती देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news